Home बुलडाणा ६ वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीला शेगावात अटक !

६ वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीला शेगावात अटक !

104

शालिमार एक्स्प्रेस मधून घेतले मुलीसह ताब्यात
प्रत्येक स्टेशनवर शौचालयात जात होता लपून
मुलीच्या अंगावर टाकीत चादर

अमीन शाह 

शेगाव :बुलडाणा (प्रतिनिधी) दि ७ मुंबई येथून ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला शालिमार एक्स्प्रेस मधून शेगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर उभय असलेल्या शालिमार एक्स्प्रेस मधून अटक केली.राठीन शंकर घोष वय ३३ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकत्ता पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.
नागपाडा मुंबई येथून एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून युवक शालिमार एक्सप्रेस ने कोलकत्ता कडे निघाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून शेगाव रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर आज बुधवारी सकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत शालिमार एक्सप्रेस शेगाव रेल्वे स्थानकावर अधिक काळ थांबवून गाडीची तपासणी केली असता नागपाडा येथून अपहृत झालेली चिमुकली आणि अपहरण करणारा आरोपी रेल्वेच्या जनरल कोच मध्ये मिळून आला. शेगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर आपल्याला पोलिसांनी पाहू नये यासाठी स्टेशन येताच आरोपी हा शौचालयात जाऊन बसला होता यानंतर आरपीएफ रंजन तेलंग आणि विनोद इंगळे यांनी कसून तपासणी केली असता आरोपी मिळून आला त्याला पॉलिसी खाक्या दाखवतात त्याने आपल्या सोबतची चिमुकली जनरल कोच मध्ये वरच्या बाजूला बसून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सदरच्या चिमुकलीला तेथून रेस्क्यू केले. यानंतर सदरची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. आरोपीची कसून चौकशी सुरु असून मुलं चोरीच्या रॅकेट ची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर सिंग, एसआय डॉ.विजय साळवे, हेकॉ.रंजन तेलंग, विनोद इंगळे, एएसआय प्रवीण भरणे, जीआरपी पीएचसी गजानन वैताकर, शहर पोलिस स्टेशनचे एपीआय सिद्धार्थ यशोद यांनी हि संयुक्त कारवाई केली.


छाया – फहीम देशमुख, शेगाव