Home मराठवाडा जागतिक कर्करोग दिन व सप्ताहाचे उद्घाटन…!!

जागतिक कर्करोग दिन व सप्ताहाचे उद्घाटन…!!

165

नांदेड ( राजेश भांगे ) दि. 4 :- फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आज दि. ०४. फेब्रुवारी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जागतिक कर्करोग दिन जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी उपस्थित रुग्ण व त्यांची नातेवाईक यांना कर्करोगाची प्रमुख लक्षणाबद्दल माहिती देऊन एखाद्या व्यक्तीस संबंधित आजाराची लक्षणे दिसून आल्यास जिल्हा रुग्णालय नांदेड येथे उपलब्ध असलेल्या तपासणी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. साईप्रसाद शिंदे, तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव व सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.