प्रतीनिधी.. वसिम खान
घाटंजी – काही वर्षाखाली घाटंजी शहर अतिशय शांत शहर दोन नंबर वेवसाय मुक्त म्हणून जिल्ह्यात पोलीस दप्तरी नोंद असून शहरात पोलीस विभागाच्या वतीने अवैध व्यवसाय करण्यासाठी देण्यात येत असलेल्या होकारामुळे शहरात रोज कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याऱ्या घटना घडत आहे. या अवैध धंद्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे? छोट्या छोट्या कारणावरून शहरात रोज वाद निर्माण होत असुन गुन्हेगारी वाटत असल्याचे दिसत आहे. आहे घाटंजी पोलीसांचे यावर कुठेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे नव्याने रुजू झालेले ठाणेदार निलेश सुरडकर, रुजू झाल्यापासून शहरातील कायदा व सुव्यवस्थे बाबत कुठलीही पावले उचललेली नाहीत परंतु अवैध धंदे सुरू करण्यासाठी शहरात आठवडी बाजार,जुनी महाराष्ट्र बँक जवळ,मच्छी मार्केट ,घाटी इंदिराआवास मध्ये खुले आम मटका,दारू, जुगार, अवैध वाहतूक , अवैध रेती तस्करी इत्यादी अवैध व्यवसाय शहरात खुलेआम सुरू असताना पोलीस विभागाला न दिसणे हे विशेष पोलीस विभागाचा आशीर्वादाने हे सर्व अवैध व्यवसाय सुरू असून पोलीस विभाग हप्ते घेण्यात धुंद असल्याचे बोलले जात आहे..