Home विदर्भ तिरोडा तालुका “पत्रकार संरक्षण समिति”ची कार्यकारणी गठीत,,,,,,,

तिरोडा तालुका “पत्रकार संरक्षण समिति”ची कार्यकारणी गठीत,,,,,,,

118
प्रतिनिधि : राजेशकुमार तायवाडे गोंदिया
गोंदिया –  पत्रकार संरक्षण समिति (महाराष्ट्र) महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नोंदनी क्रमांक महा. 27/16 सी.आर. क्रमांक एफ 18386/2016 चे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार गोंदिया जिल्हा अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव रोशन बोरकर यांच्या उपस्थितीत सुरभि होटल येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी तिरोडा तालुका पत्रकार संरक्षण समितिची कार्यकारणी गठीत करण्यात आली. तिरोडा तालुका पत्रकार संरक्षण समिति अध्यक्ष श्रावण बरीयेकर, उपाध्यक्ष प्रविण शेंडे, सचिव भुपेन्द्र रंगारी, सह सचिव मनोज भांडारकर, कोषाध्यक्ष अजय बर्वे, सदस्य सचिनकुमार पटले व आरिफ़ पठाण यांची निवड करण्यात आलेली व सर्व तिरोडा तालुका पत्रकार संरक्षण समितिला संस्थापक व अध्यक्ष विनोद पत्रे, जिल्हा अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे व जिल्हा सचिव रोशन बोरकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.