Home यवतमाळ चंद्रपूरच्या लोकसभेसाठी मनसे सज्ज, उंबरकरांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा पसंती.

चंद्रपूरच्या लोकसभेसाठी मनसे सज्ज, उंबरकरांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा पसंती.

196

▪️ कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर उंबरकरांचा “भावी खासदार” म्हणून उल्लेख

यवतमाळ / प्रतिनिधी
देशात “एक नेशन एक इलेक्शन” आणून भाजपा प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणत असल्याचा आरोप विरोधक करीत आहे. यातच आता येणाऱ्या निवडणुका मध्ये आपल मताधिक्य कायम ठेवून आपल पक्षाचं अस्तिव कायम ठेवण्याची कस प्रादेशिक पक्षांना लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली असून या मतदारसंघांमध्ये आपले लक्ष केंद्रित करण्याचे काम पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून करण्यात येतं आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक व संभाजीनगर या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नुकसान नाशिक व पुणे लोकसभा क्षेत्रांचा आढावा घेतलेला आहे. यातच आता महाराष्ट्र सैनिक चंद्रपूर लोकसभेसाठी पक्ष नेतृत्वाकडे आग्रही असल्याचे दिसून येतं आहे. तर या निवडणुका करिता वणीच्या राजु उंबरकराना संभाव्य उमेदवार म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी पसंती दर्शविली आहे.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मनसेचे दमदार प्राबल्य असून, याची मदत गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या धानोरकरांना झाली होती. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्राचा सामावेश आहे. या सहा ही विधानसभा क्षेत्रात मनसेची चांगली पकड असून, कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षाकडे आहे. याचाच फायदा आता येणाऱ्या निवडणुकांत पक्षाला होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात ठरवल्या जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि वणी विधानसभेचा समावेश या लोकसभा क्षेत्रांत होतो. वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचे राजु उंबरकर यांनी गेल्या २० वर्षापासून आपली ताकद मजबूत ठेवून विरोधकांना तगडे आव्हान निर्माण केले होते. आता याच उंबरकरांना पक्षाकडून लोकसभेची जबाबदारी देऊन विदर्भामध्ये आपला पहिला खासदार निवडून आणण्यासाठी चंग बांधल्या जात आहे. यासाठी कार्यकर्त्यांकडूनही उंबरकर यांच्या नावाला चांगली पसंती असून येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप सह विरोधकांनाही मनसेच आव्हान स्विकारावे लागेल.

चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी राजु उंबरकर यांना द्यावी यासाठी महाराष्ट्र सैनिकांकडून सोशल मीडियावर जोरदार पोस्ट वायरल केल्या जात आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांकडून व महाराष्ट्र सैनिकांकडून सुद्धा उंबरकर यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दाखवून “भावी खासदार राजुभाऊ उंबरकर” असतील अशी घोषणा केली जात आहे.
या मतदारसंघात संघटनात्मक बांधणी, पक्ष प्रवेश, मेळावे आणि विविध उपक्रमावर पक्षाने भर दिली आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंती आणि दहीहंडी कार्यक्रमाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करत, युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उंबरकर यांनी केला आहे. तर याच कालावधीत वणी विधानसभा पक्षाकडे युवकांचा वाढलेला कल, आगामी काळात मताधिक्य वाढविण्यास साह्यभूत ठरू शकेल.
त्यामुळे येत्या काळात ही उमेदवारी उंबरकर यांना ही उमेदवारी देऊन आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कशाप्रकारे व्यूहरचना आखतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.