Home यवतमाळ घाटंजी शहरात अवैध धंदे बंद; अवैध धंदे लपुन छपुन, चोरीने सुरू असल्याचे...

घाटंजी शहरात अवैध धंदे बंद; अवैध धंदे लपुन छपुन, चोरीने सुरू असल्याचे आढळल्यास आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करु…! – ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक PI NILESH SURADKAR

138
➡️ घाटंजी तालुका बजरंग दलाची जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे कडे लेखी तक्रार

यवतमाळ, 30 सप्टेंबर – यवतमाळ जिल्ह्याचे मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ (SUPRITENDENT OF POLICE) यांच्या आदेशानुसार घाटंजी शहरात अवैध धंदे बंद करण्यात आले असून, यदा कदाचित लपुन छपुन, चोरीने असे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास त्यांचे विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक (POLICE INSPECTOR NILESH SURADKAR) निलेश सुरडकर यांनी दिली.
घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक (POLICE INSPECTOR NILESH SURADKAR) निलेश सुरडकर हे रुजू झाल्यापासून मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या आदेशानुसार घाटंजी शहरात अवैध धंद्यावर अंकुश लावलेला आहे. विशेष म्हणजे पोलीस ईतर कारवाईत कधी कधी व्यस्त असल्याने काही ठिकाणी लपून छपून, चोरीने अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा घाटंजी शहरात सुरू आहे. मात्र, या बाबत नागरिकांनी घाटंजी पोलीसांना माहिती दिल्यास त्यांचे विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही घाटंजीचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर (PI NILESH SURADKAR) यांनी दिली आहे.
बुधवारी यवतमाळ येथील पोलीस अधीक्षक यांना घाटंजी तालुका बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भेटण्यासाठी गेले असता, ते दौऱ्यावर असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी घाटंजी तालुका बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा तक्रार अर्ज स्विकारला आहे. घाटंजी येथील गोवंश हत्या प्रकरणी आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. त्यात बजरंग दलाचे प्रमुख संयोजक राहुल गायकवाड, सह संयोजक राहुल मस्के, विजय चव्हाण, प्रेम ऊदार, निकु टेकाम, संदीप दोणाडकर, उज्वल धात्रक, बाला पेंदोर आदींचे स्वाक्षऱ्या आहे. दरम्यान, घाटंजी पोलीस ठाण्यात ठाणेदार निलेश सुरडकर हे रुजू झाल्यापासून अनेक अवैध धंदे बंद असुन, गोवंश हत्या प्रकरणात घाटंजी पोलीसांनी चार गुन्हे नोंदवुन 11 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करुन गोवंश प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तक्रारीच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पोलीस महासंचालक मुंबई आदीं कडे पाठविले आहे.
तथापि, घाटंजी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 355/2023, 579/2023, 0826/2023 व 828/2023 प्रकरणात घाटंजी पोलीसांनी फिर्यादी राहुल प्रभाकर मस्के (वय 26) यांच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी सलीम शेख कुरेशी, अब्दुल नदीम कुरेशी, असलम चांद कुरेशी तसेच शेख तनवीर शेख करीम, शेख गणी शेख करीम, शेख सलीम रहीम कुरेशी, शेख अलीम शेख, शेख तनवीर शेख करीम, शेख जमीर शेख करीम, शेख युनुस शेख चांद व रिजवान शेख इरफान आदीं विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 429, 504, 506, 34 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 अंतर्गत सह कलम 5अ, 5ब, 5क अंतर्गत गुन्हे नोंदविले होते. तथापी, घाटंजी येथील एका दैनिकाचे वार्ताहर हे जाणुन बुजुन घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरडकर हे चांगले काम करत असतांना त्यांनी घाटंजी शहरात गुन्हे कमी केलेले असतांना त्यांचे विरुद्ध खोट्या तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. घाटंजी ठाणेदारांविरुद्ध हेतु पुरस्सर, खोट्या तक्रारी करुन शासनाची दिशाभूल करत आहे. वास्तविक पाहता संबंधित पत्रकाराच्या कुटुंबियाविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गोवंश हत्याचे दोन ते तीन गुन्हे दाखल असुन प्रलंबित आहे. त्यामुळे कुटुंबियांविरुद्ध केलेल्या कारवाई मुळेच संबंधित पत्रकार हे ठाणेदार निलेश सुरडकर यांचे विरोधात बिन बुडाच्या तक्रारी करत असल्याचा आरोप बजरंग दलाचे प्रमुख संयोजक राहुल गायकवाड यांनी यवतमाळ येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल लेखी तक्रारीतुन केला आहे. तसेच घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या विरुद्ध आकसापोटी केलेल्या तक्रारीवरून कोणतीही कारवाई करण्यात येउ नये, असेही लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
➡️ दरम्यान, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर (POLICE INSPECTOR NILESH SURADKAR) यांची प्रतिक्रिया घेतली असता, माझ्या विरोधात संबंधित पत्रकाराने त्यांच्या कुटूबियांविरुद्ध केलेल्या कारवाई मुळे आकसापोटी शासन व ईतर पोलीस विभागाकडे तक्रारी केल्या असून सदर तक्रार खोटी आहे. घाटंजी येथील गोवंश प्रकरण गंभीर असून गोवंश व इतर प्रकरणाबाबत कुणीही माहिती दिली तर तात्काळ कारवाई करण्यात येईल. आपण कुणाच्याही दबावाला घाबरणार नसुन दोषी विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. घाटंजी येथील एक तथाकथित पत्रकार बाबत घाटंजी ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर (POLICE INSPECTOR NILESH SURADKAR) यांना विचारणा केली असता, त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध गोवंश प्रकरणात घाटंजी पोलीसांनी कारवाई केल्याने ते चिडुन गेले आहे. तसेच त्यांनी मी या पुर्वी वर्धा येथील वृत्त पत्रात तत्कालीन पोलीस अधीक्षक भुजबळ विरुद्ध मालीका चालविली होती, अशी धमकी दिली होती. या बाबत पोलीस दफ्तरी स्टेशन डायरीत नोंदी घेतल्याचे ठाणेदार निलेश सुरडकर (PI NILESH SURADKAR) यांनी सांगितले. विशेष म्हणजे घाटंजी शहरात अवैध धंदे बंद असुन, पोलीस इतर कारवाईत व्यस्त असल्यास लपुन छपुन, चोरीने अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास त्यांचे विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर (POLICE INSPECTOR NILESH SURADKAR) यांनी स्पष्ट केले आहे.