Home औरंगाबाद औरंगाबाद दामिनी पथकाने त्या महिलेस अटक केली अन , सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला...

दामिनी पथकाने त्या महिलेस अटक केली अन , सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला ,

78

 

अमीन शाह

व्यसन जडलं की त्यासाठी कायपण करण्याची तत्परता ही व्यसनाधिन व्यक्तीकडुन करवून घेते याचा अनुभव बहुतांशी अनेकांनी अनुभवला आहे. दारु च्य व्यसनाकरीता अनेक घरातील जिव गेले असून अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहेत.

अनेकांची मुले ही बापा विना अनाथ झाली आहेत. परंतु दारु, गांज्या ड्रग्स्‌ आदी व्यवसानाचे अनेक दाखले आपण एकले असले तरी आता या घटनेत पेट्रोल सेवनाने नशा करण्याचा प्रकार हा काही वेगळाच वाटत असला तरी ही वास्तविकता औरंगाबाद शहरातील एका पेट्रोल चे सेवनातुन नशा करणाऱ्या महिलेची आहे.

तिच्या पोटी दोन चिमुकली मुले असतांना तिला पेट्रोलची नशा करण्याची सवय लागली… अन या सवयीमुळे तिने चक्क नागरिकांच्या दुचाकीतील पेट्रोल चोरी करण्याचे प्रकार सुरु केले. पेट्रोल चोरीची माहिती नागरिकांना झाल्याने त्यांनी या संदर्भात दामिनी पथकला याबाबत माहिती दिली.

बीड बायपास परिसरात असलेल्या एशियाड कॉलनी मध्ये हा प्रकार घडला. त्या प्रकरणातील आरोपी महिलेला पोलीसांनी ताब्यात घेत, फैयामी इन्सानियत फाऊंडेशनच्या वतीने मनसोपचार तज्ञांकडे उपचारासाठी दाखल केले.

परिसरातील दुचाकीतील पेट्रोल चोरीस जाण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने या परिसरातील वाहनधारकांनी व नागरिकांनी चोरी करणाऱ्याला पकडण्यासाठी पाळत ठेवली यावेळी हा प्रकार महिलेच्या वतीने होत असल्याचे उघड झाले. सदर महिला ही त्याच परिसरात पत्राच्या शेडमध्ये मध्ये दोन मुले व पतीसह राहते. सदर घटना उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे ,

त्यावेळी दामिनी पथकाने तिचे घर गाठुन तिला ताब्यात घेतले असतांना सुध्दा ती नशेत होती. तिला सुरुवातीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या महिलेचा पती व तिच्या आईने सांगितले की, ही अनेक महिन्यापासून पेट्रोलची नशा करीत आहे आम्ही याला समजावून थकलो आहो ,

अर्धा तासही नशा केल्याशिवाय राहू शकत नाही…

 

बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्स परिसरातील एशिआड कॉलनीमध्ये 50 ते 60 महिला पुरूष जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि दामनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक महिला घरासमोर उभ्या दुचाकीतून पेट्रोल चोरत असल्याची नागरिकांनी तक्रार केली.  दामिनी पथकाने सदर महिलेची माहिती घेऊन तिचं घर गाठलं.  यावेळी ती आपल्या नवरा अन् दोन चिमुकल्या मुलांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहत असल्याचे समोर आले. दामिनी पथकाने तिच्याकडे विचारणा केली असता, मी पेट्रोलची नशा करते असे तिने सांगितले. तसेच अर्धा तासही मी नशा केल्याशिवाय राहू शकत नाही असे ती म्हणाली. हे ऐकून पथकाला धक्काच बसला. लहानपणीच नशा करण्याची सवय लागल्याचं तिने सांगितले. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांकडे उपचारही केले, मात्र काहीच उपयोग झाला नाही, असे तिच्या पतीने सांगितले. शेवटी आता पोलिसांनी पुढाकार घेऊन सदर महिलेला मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे पाठविले आहे.