नांदेड(प्रतिनिधी):-बालाजी सिलमवार
माहूर लांजी येथील लोकनियुक्त सरपंच तथा माजी सभापती श्री मारोतीभाऊ रेकुलवार यांच्या मातोश्री शांताबाई बंडू रेकुलवार वय वर्ष ७० यांचे आज दिनांक ८ऑक्टोंबर २०२३ ला सकाळी सहा वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांचे अंत्यविधी आज दुपारी तीन वाजता लांजी ता.माहूर येथे होणार आहे.त्यांना गजानन,मारोती अशी दोन मुले,एक मुलगी,पती,नातू असा परिवार असून श्रीमती शांताबाई रेकुलवार हया मन्नेरवारलू समाजातील प्रतिष्ठित ज्येष्ठ महिला असून त्याच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरला आहे.
रेकुलवार परिवारास या दुःखातून ईश्वर सावरण्याची शक्ती देवो. “भावपूर्ण श्रद्धांजली”