Home यवतमाळ यवतमाळ अमोलकचंद विधी महाविद्यालयात ‘बालन्याय’ कायद्याचे व्यावहारिक पैलू वर कार्यशाळा..!

यवतमाळ अमोलकचंद विधी महाविद्यालयात ‘बालन्याय’ कायद्याचे व्यावहारिक पैलू वर कार्यशाळा..!

75
➡️ यवतमाळ येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी / यवतमाळ, 11 ऑक्टोंबर :- विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ संचालित यवतमाळच्या अमोलकचंद विधी महाविद्यालयात नुकतीच ‘बालन्याय’ कायद्यावर कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेसाठी जिल्हा बाल संरक्षण केंद्राचे अधिकारी देवेंद्र राजुरकर, कु. माधुरी पावडे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रभारी प्रा. डॉ. संदीप नगराळे आदीं उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत आवर्जून उपस्थित होते.
बाल कायद्याच्या व्यावहारिक पैलूंची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन प्रा. योगिता बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी बालकांचे अधिकार व त्यांच्या ऐतिहासिक संदर्भ याबाबत कु. माधुरी पावडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर बालन्याय कायदा, त्यातील तरतुदी तसेच प्रत्यक्ष काम करतांनाचे अनुभव याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी खुल्या चर्चेत सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत हे होते.
त्यांनी बालकांचे सज्ञान, वय आणि कायद्याच्या तरतुदी यावर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, व इतर न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत सोदाहरण भाष्य केले. देशाच्या भविष्यासाठी बालकांची काळजी व संरक्षण योग्य प्रकारे व्हायला पाहिजे, अशी भुमिका प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांनी यावेळी मांडली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा. डॉ. संदीप नगराळे यांनी प्रास्तविक केले. आजच्या घडीला बालकांचे अधिकार आणि कायदेशीर तरतुदींची सांगड घालीत कायद्यात काही सुधारणा आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
कार्यशाळेचे संचालन प्रतीक पोळ यांनी केले. तर आभार कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. योगीता बोरा यांनी मानले.
यावेळी डॉ. स्वप्नील सगणे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी, प्रा. अमिता मुंदडा, ॲड. विजया घाडगे, ॲड. सोनाली भोयर, ॲड. रुपाली डीडवानीया, ॲड. रंजीत अगमे, प्रा. शंतनू कनाके, ॲड. अक्षीता जयस्वाल तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते.