Home बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेवर मुक्काम पोस्ट साखरखेर्डाचा झेंडा

स्थानिक गुन्हे शाखेवर मुक्काम पोस्ट साखरखेर्डाचा झेंडा

101

भगवान साळवे
जिल्ह्यामध्ये महत्वाच्या,मोठ्या आणि संवेदनशील गुन्ह्याचा तपास करून ,उघडकीस यावे यासाठी स्थानिक गुन्हे शाखा निर्माण करण्यात आली गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे किचकट आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकिस आणून संघटित गुन्हेगारीशी लढा देण्याकरिता रणनिती तयार करत असतात. त्याचबरोबर अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा करत असते त्यासाठी या विभागात काम करण्यासाठी हुशार चपळ कर्तव्यदक्ष अधिकारी वर्ग आणि कर्मचारी लागतात चॅलेंजिंग काम असल्यामुळें या विभागात काम करण्याची संधी मिळावी यासाठी जिल्हाभरातील पोलीस आणि अधिकाऱ्याची प्रचंड स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये अनेक जण बाद होतात असे असले तरी साखरखेर्डा ठाण्यात काम केलेल्या पोलिसाना मात्र चांगली संधी मिळाली असून गुन्हे शाखा प्रमुख सह दोन पोलीस अधिकारी आणि एक कर्मचारी असे चार जण येथे काम करीत असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेमधे साखर खेरड्यात काम केलेल्या पोलिसांचा स्थानिक गून्हे शाखेत दबदबा बघायला मिळतो ही साखरखेर्डासाठी भूषणाची बाब असून जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पीआरओ ने देखील याच पोलीस स्टेशनमध्ये मधून ठाणेदार म्हणून गेले आहे त्यामुळे साखरखेर्डा पोलीस स्टेशन ला पोलीस विभागात एक वेगळे महत्त्व बघायला मिळत आहे

स्थानिक गुन्हे शाखा मुख्य गुन्हेगारी चौकशी आणि अत्यंत संवेदनशील गुन्हेगारी शोधात गुंतलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीच्या शोधांना सामोरे जाण्यासाठी एलसीबीचा कर्मचारी अत्यंत हुशार आणि हुशार पाहिजेत. . म्हणूनच ही शाखा मोठ्या महत्त्वाच्या गुन्ह्यात पोलिस ठाण्यांसह समांतर तपासणी करते. विशेषत: गुन्हेगारी व गुन्हेगारांच्या विविध प्रकारच्या नोंदी सांभाळण्यासाठी देखील ही शाखा काम करत असून आणि किचकट गुन्ह्याचा तपास या शाखेने केला आहे या शाखेची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक अशोक लांडे हे सक्षमपणे सांभाळत असून त्यांनी 2013 मधे साखरखेर्डाचे ठाणेदार म्हणून अत्यंत सक्षमपणे काम केले आहे याच शाखेमध्ये 2022 ला दुय्यम फौजदार म्हणून काम केलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे हे स्थानिक गुन्हे शाखेत काम करत आहेत तर नुकतेच या पोलिस स्टेशन मधे ठाणेदार म्हणून काम करत असलेले ठाणेदार नंदकिशोर काळे यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेत झाली आहे तर याच पोलीस ठाण्यात खुपिया विभागात काम केलेले गजानन दराडे हे देखील स्थानिक गुन्हे शाखेत महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत एकंदरीत स्तानिक गुन्हे शाखेत साखरखेर्डा ठाण्यात ज्यांनी काम केले अश्या पोलिस अधिकाऱ्यांचा दबदबा सध्या आहे विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये अत्यंत चोखपणे आणि दबंग अधिकारी म्हणून ज्यांची ओळख अख्या महाराष्ट्रात बघायला मिळाली ते तत्कालीन साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे हे देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू पीआरओ अर्थात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत आहेत तर नव्याने सुरू झालेले साखरखेर्डाचे ठाणेदार स्वप्निल नाईक हे देखील स्थानिक गुन्हे शाखेतूनच आले आहेत त्यामुळे मुक्काम पोस्ट साखरखेर्डा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा एक उत्कृष्ट समीकरण बघायला मिळते


.