सिंदखेडराजा तालुक्यात उडाली खळबळ ,
अमीन शाह ,
स्प्लेंडर मोटरसायकलने सिनेस्टाईल पाठलाग करून डोळ्यात मिरची पावडर टाकून तीन युवकांनी किनगावराजा येथील टापरे एजन्सी वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां जवळील सुमारे 4 लाख 43 हजार 372 रुपयांची रोख रक्कम लुटली असून या घटनेने किनगावराजा परिसरात एकच खळबळ उडाली आहे
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
फिर्यादी विष्णू काकड हे येथील टापरे सुपरमार्केट दुकानात कामावर असून दिनांक 19 ओक्टॉबर रोजी रात्री बीबी, मलकापूर पांग्रा व दुसरबीड येथून उपरोक्त रक्कम घेऊन येत असतांना संध्याकाळी 6.15 च्या दरम्यान तढेगाव फाटा ते राहेरी पुल दरम्यान विष्णू काकड यांच्या मागावर असलेल्या हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवरून अज्ञात 3 चोरट्यानी विष्णू काकड यांच्या गळ्यातील डिक्कीवर असलेली पैशाची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी चोरट्यांचा प्रतिकार करतांना काकड खाली पडले असता चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील बॅगेतील एकूण 4 लाख 43 हजार 372 रुपयांची रोख रक्कम लुटली व घटनास्थळावरून पोबारा केला.
विष्णू काकड यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचे पोलीस ठाण्यात कथन केले असता त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांवर किनगावराजा पोलीस ठाण्यात कलम 394,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्पुरता प्रभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गोरे हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.घडलेल्या घटने मुळे सिंदखेडराजा तालुक्यात खळबळ उडाली आहे ,