Home अकोला जवायाचा राग अनावर झाला अन , विपरितच घडलं ??

जवायाचा राग अनावर झाला अन , विपरितच घडलं ??

97

 

 

अमीन शाह

अकोला ,

अकोला शहरातील हैदरपुरा या भागात जवायाने आपल्या सासुवर चाकू हल्ला केला असल्याची खळबळजनक घटना आज 21 च्या रात्री 9 च्या सुमारास घडली आहे ,

मिळालेल्या माहिती नुसार
शमशाद बी रफिक खान या ४० वर्षीय महिलेवर आरोपींनी चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना अकोला – खदान पोलीस ठाण्यांतर्गत हैदरपूर संकुलात घडली. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सुभाष दुधगावकर, खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आपल्या पथकासह घटनास्थळी पहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, मयत ही सासू असून आरोपी जावई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद नावाच्या व्यक्ती आणि त्याची पत्नी आसमा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.