Home यवतमाळ हिवरा(संगम)गावकऱ्यांचे साखळी उपोषण

हिवरा(संगम)गावकऱ्यांचे साखळी उपोषण

105

(लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय)


यवतमाळ:-
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला पठिंबा देण्यासाठी हिवरा(संगम) गावकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन केले होते त्यामध्ये सरकारने मागितलेली मुदत संपुनही आरक्षण देण्याचा निर्णय न घेतल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे यामध्ये त्यांची प्रकृती बिघडत असल्याने शासनाने तत्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करीत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) गावकऱ्यांनी जाहीर पाठिंबा देत दि .३०ऑक्टोबर पासुनछत्रपती संभाजी महाराज चौकात साखळी उपोषण आंदोलन सुरू करून लोकप्रतिनिधी व राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा ठराव घेत तशा आशयाचे निवेदन तहसीलदार,महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना देण्यात आले.