फुलचंद भगत
वाशिम:-मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली इथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या समर्थनार्थ मंगरूळपीर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ता 1 बुधवार पासून लाक्षणिक उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात येणार आहे या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश शासन जारी करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही. खरे, सच्चे आणि कडवट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी मंगरूळपीर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ता 1 बुधवारपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून शेकडोच्या संख्येने या लाक्षणिक उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.या लाक्षणिक उपोषणाला शिवराज मित्र मंडळ, गुरुध्वज मित्र मंडळ, राम ठाकरे मित्र मंडळ, शिवसेना उबाठा शहर प्रमुख यांनी पाठिंबा दर्शविला असून मोठ्या संख्येने या लाक्षणिक उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन मंगरूळपीर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206