कर्जत…
नितीन दादा सावंत युवा प्रतिष्ठान च्या वतीने कर्जत व खालापूर तालुका अंतर्गत पर्यावरण पुरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2023 चे आयोजन केले गेले होते.
तालुक्यातील विविध नागरिकांनी यात भाग घेतला होता .खोपोली येथील गेल्या कित्येक वर्षापासून मनवेधक देखावे बनविणारे गायकर कुटुंबीय हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
श्री.व सौ.मिनल संतोष गायकर हे सहज सेवा फाऊंडेशन चे संस्थापक खजिनदार असून सामाजिक सेवा जोमाने करीत असताना उत्सव साजरा करताना सुद्धा सामाजिक जीवनात संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात. रोटरॅक्ट क्लब ऑफ खोपोलीचे माझी अध्यक्ष असून मिनल गायकर ह्या खोपोलीतील नामांकित चित्रकला शिक्षिका असून जिल्ह्यातील प्रसिद्ध अश्या प्राचीन विरेश्र्वर मंदिरात महाशिवरात्री मध्ये साकारलेली रांगोळी पाहून भाविक थक्क होवून जातात.
कर्जत येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी रोख रक्कम 15000/- रुपये व सन्मानचिन्ह देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे देखील गणेशोत्सव 2023 चे ते प्रथम मानकरी ठरलेले आहेत.
गायकर कुटुंबाचे कर्जत खालापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.