Home यवतमाळ आठवडी बाजार, यवतमाळ श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ...

आठवडी बाजार, यवतमाळ श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ या ठिकाणी क्ष-किरण विभागामध्ये CT Scan व X-Ray फिल्म खरेदीत मोठया प्रमाणात घोटाळा – विनोद पवार शिवसेना शहर प्रमुख

84
चौकशी व कार्यावाही होणे बाबत तक्रारीसह जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन…!
यवतमाळ- श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ या ठिकाणी सन २०१५ पासुन HMIAS ही ऑनलाईन प्रणाली सुरु झाल्यापासुन या ठिकाणी CT Scan व X-Ray चे रिपोर्ट ऑनलाईन पध्दतीने डॉक्टरांना पाठविण्यात येत होते. यामुळे रुग्णांना CT Scan व X-Ray ची फिल्म देणे बंद करण्यात आले होते परंतू माहिती अधिकार अंतर्गत माहिती मिळाल्यापासून रुग्णालय प्रशासनाने सन २०१५-१६ आणि २०१९ या कालावधीत मोठया प्रमाणात फिल्म खरेदी केल्याचे दिसुन येत आहे व अजुनाही रुग्णांना CT Scan व X-Ray ची फिल्म देणे बंदच आहे. यावरुन दिसुन येत आहे की, CT Scan व X-Ray फिल्म खरेदीमध्ये मोठया प्रमाणात घोटाळा आढळुन येत आहे. या करीता दिनांक ०१.०२.२०२३ रोजी मा. अधिष्ठाता श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ यांच्या कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती. परंतु मा. अधिष्ठाता यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चौकशी व कार्यवाहीची माहिती मिळालेली नाही या करीता आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या रुग्णालयामध्ये आंदोलन करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी असा इशारा विनोद पवार शिवसेना शहर प्रमुख यांच्या वतीने देण्यात आला.