Home जालना मैत्रेय गुंतवणूकदारांचे आंदोलन चिघळले, लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम यांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा...

मैत्रेय गुंतवणूकदारांचे आंदोलन चिघळले, लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम यांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

105

जालना /लक्ष्मण बिलोरे

मैत्रेय उद्योग समुहातिल गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब ३१ ऑक्टोंबर रोजी अत्यंत धाडसी निर्णय घेतला व मंत्रिमंडळाची बैठक ज्या दिवशी राहते त्या दिवशी मंत्रालयासमोर स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून “आत्मदहन” करण्याचा प्रयत्न केला. मैत्रेयच्या इतिहासामध्ये अशी घटना आज पर्यंत झालेली नाही. त्याच दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिटफंड घोटाळ्यांच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मैत्रेय संमुहातील गुंतवणूकदारांना पैसे मिळू नये म्हणून शासनाने असा निर्णय घेऊन फसवणूक झालेल्या लोकांना पुन्हा भुलथापा देण्याचं काम केले असा आरोप लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केला आहे. आम्हाला कायदे, कायद्यामध्ये सुधार किंवा न्यायालयाच्या तारखा नको, ज्यांची फसवणूक झाली त्यांचे पैसे हवे आहेत. मैत्रेय उद्योग समूहाला शासनाने मान्यता दिली, शासनाने मैत्रेय उद्योग समूहाची
संपत्ती ताब्यात घेतली म्हणून शासनाने फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत करावे असे गेडाम म्हणाले. नागपूर जिल्ह्यापासून मुंबईच्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटच्या शिपाई जवळ भाऊसाहेबांचा व माया ताईंचा फोटो प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये होता तो फोटो पाहून त्यांना अटक करणे हा त्यांच्या उद्देश होता. परंतु जसे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून मिठाईच्या पेटार्‍यातून फरार झाले त्या प्रकारे भाऊसाहेब नागपूर मधून फरार होऊन मुंबईत पोचले. मंत्रालयाच्या गेटवर आल्या नंतरही पोलिसांना कळले नाही. लोकाधिकार परिषदेच्या सगळ्या महिला प्रतिनिधी अगोदरच मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वासमोर घोळक्याने होत्या. अचानक किशोर गेडाम मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचताच उपस्थित पोलिसांमध्ये एकच गोंधळ उडाला, चारही बाजूला असलेले सगळे पोलीस अधिकारी धावून आले.गेडाम यांना आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर लोकाधिकार परिषदेच्या माया उके यांना महिला पोलिसांकडून अटक झाली. किशोर गेडाम आणि माया उके यांना पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आणले म्हणून लोकाधिकार परिषदेच्या सगळ्या महिला पोलीस स्टेशनला धावून आल्या .मैत्रेय संमुहातील गुंतवणूकदार व प्रतिनीधी यांची यांच्यात कल्लोळ उडाला.आंदोलक किशोर गेडाम आणि माया उके यांना अटक होतात धावपळसुरू झाली . लोकाधिकार परिषदेच्या आंदोलकांना मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर त्यानंतर आंदोलक किशोर गेडाम म्हणाले ‘ आम्ही दोन लोक या ठिकाणी आहोत आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका कसली पण कारवाई करा या इतर लोकांना सोडून द्या’. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या महिलांना सोडून दिले व किशोर गेडाम व माया उके यांच्यावर कारवाई केली. मुंबईच्या सीनियर कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आले. या दरम्यान, कोर्टाने म्हटले ‘ स्वतःच्या जीव द्याल तरी हे सरकार तुम्हाला पैसे देणार नाही’ अशा प्रकारे राज्य सरकारवर सीनियर कोर्टाने तासेरे ओढले.मैत्रेय प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. उग्र आंदोलन वगैरे असे काही करू नका असे निर्देश कोर्टाने दिले. कोर्टातून PR बाऊंडवर लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब व माया उके यांना जामीन देण्यात आला.त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीसांनी किशोर गेडाम व माया उके त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचवून दिले.आत्मदहन आंदोलनामध्ये किशोर गेडाम यांना जीवदान मिळाले.मुंबई पोलीस, मंत्रालय पोलीस, नागपूर -कामठी पोलीसांच्या चतुराईमुळे गेडाम यांचा जीव वाचवला. हे आंदोलन झाल्यानंतर असोशियन चे प्रवक्ते भैय्या माळी यांनी संपूर्ण महाराष्ट्र किशोर गेडाम यांच्या पाठीशी उभा आहे. मैत्रेय संमुहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधीनी प्रत्येक घरातून एक गुंतवणूकदार बाहेर काढा. लोकाधिकार परिषद तीव्र आंदोलन करू शकते हे शासनाच्या निदर्शनास आले आहे.मैत्रेय प्रकरण यशस्वी होणार आहे.’मैत्रेय’ गुंतवणूकदारांना परतावे मिळवून देण्यासाठी लोकाधिकार परिषदेचे किशोर गेडाम यांचे खंबीर नेतृत्व गुंतवणूकदारांच्या पाठीशी आहे.अशी माहिती लोकाधिकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या मंगला हांडे यांनी दिली.