प्रतिनिधी – पाथरी
परभणी , दि. ०५ :- येथील स्व नितीन महाविद्यालयात महिला सक्षमिकरण आणि अत्याचार या विषयी जनजागृती कार्यक्रम बुधवार ५ जानेवारी रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमा साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाथरी पंचायत समितीच्या सभापती सौ कल्पना सदाशिवराव थोरात या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या उप प्राचार्या प्रा सौ अर्चना बदने या होत्या. या कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ शितल गायकवाड,डॉ शारदा पवार, प्रा डॉ मारोती खेडेकर, प्रा डॉ भारत निर्वळ तसेच विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून कु प्रशंसा गुंडेकर यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी सभापती सौ कल्पनाताई थोरात यांनी मुलींना होणा-या त्रासा पासून कशी सुटका करता येते. अशा प्रसंगी नेमकी मुलिंनी कोणती भूमीका घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ शारदा पवार, प्रा अर्चना बदने, प्रा डॉ मारोती खेडेकर यांनी मुलिंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ शितल गायकवाड यांनी केले तर आभार डॉ शारदा पवार यांनी मानले. या कार्यक्रमा साठी महाविद्यालयातील विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.