Home बुलडाणा साखरखेर्डा येथे जीवघेण्या ड्रग्ज मुळे सात जणांचा मूर्त्यु ,

साखरखेर्डा येथे जीवघेण्या ड्रग्ज मुळे सात जणांचा मूर्त्यु ,

104

साखरखेर्डा येथे होणारी ड्रग्ज ची विक्री बंद करण्यात यावी ,

एम आय एम पक्षाचा आंदोलनाचा इशारा ,

जिल्हा पोलीस अधीक्षक ,
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन ,

 

अमीन शाह ,

बुलडाणा ,

साखरखेर्डा व परिसरात अंमली पदार्थांची विक्री जोरात सुरू असून सदर पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आपल्या मागणीचे निवेदन ए. आय. एम. आय. एम. च्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा आणि जिला पोलीस अधिक्षक यांना आज देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, साखरखेर्डा येथे गेल्या अनेक दिवसांपासून नशे साठी वापरला जाणारा पांढरा पावडर ड्रग्जची विक्री होत आहे. सदर पदार्थांच्या सेवनामुळे साखरखेर्डा येथील शेख जावेद शेख शकुर, शेख साबीर शेख शकुर, , शेख फैजान शेख मोहसीन शेख आदील शेख अकील, शेख अजहर शेख युसुफ, शेख अजहर शेख हनीफ, या सात युवकांचा अकाली दुदैवी मृत्यु झाला आहे. तसेच या पावडरच्या अती सेवनांमुळे अनेक जणांवर विविध रूग्णालयात सद्या उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत सुध्दा अमली पदार्थ एम. डी. ड्रग्ज पावडरमुळे काही युवक बुलडाणा, चिखली येथील विविध
रुग्णालयात उपचार घेत आहे. नशेच्या सदर पावडर विक्रीमुळे अनेक युवकांचे संसार उध्दवस्त झाले आहे. सदर एम. डी. ड्रग्जचा वापार हे नशे साठी वापरल्या जाणारी ताळी मध्ये टाकुन लोकांना दिल्या आहे. विशेष म्हणजे एम. डी. ड्रग्जचा काळा बाजार साखरखेर्डा बस स्टॅण्ड, वार्ड नं. 1, वार्ड नं. 2 व वार्ड नं.6 या ठिकाणी खुलेआम सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभागाने साखरखेर्डा येथे सुरू असलेला एम. डी. ड्रग्ज विक्री करणा-यांवर आळा घालावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
येथे होणारी अमली पदार्थ विक्री सात दिवसांच्या आत बंद करण्यात यावी अन्यथा आय. एम. आय. एम. पक्षाच्या च्या वतीने तिर्व आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.देण्यात आलेल्या निवेदनावर
डॉ.मोबीन खान, बुलडाणा जिल्हाअध्यक्ष, शेख अकील शेख अहेमद, वरिष्ठ नेता, असलम शाह अब्दुल्ला शाह, शहर अध्यक्ष साखरखेर्डा, युनुस शाह लाल शाह, सिंदखेडराजा, तालुका उपाध्यक्ष, जुबेर शाह अकबर शाह, शहर महासचिव, शेख रफीक शेख शफीक, पंचायत समिती सदस्य सिंदखेडराजा, शेख आसीफ शेख जुसुफ, शहर महासचिव, कासीम खान अहेमद खान, सामाजिक कार्यकर्ता अब्दुल्ला शहा अवर शहा, असलम शाह आदींच्या स्वाक्ष-या आहेत.