नांदेड / मुखेड , दि. ०५ :- मुखेड शहरातील फुलेनगर येथील रहिवासी असलेले विजय किशन बनसोडे यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे.
आणि शासनाकडून मंजूर घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास रेती विना स्वामित्व शुल्क देणे बाबतचा निर्णय घेतला असून मला त्या निर्णयानुसार रेती देण्यात यावी, मी कुठल्या शासकीय रेती घाटावरून माझी देय असलेली पाच ब्रास रेती घ्यावी याचा परवाना मला देण्यात यावे अशी मागणी आदी बनसोडे यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केले आहे , आणि जर मला घर बांधण्यासाठी पाच ब्रास रेती चा परवाना नाही मिळाला तर मी लोकशाही मार्गाने आपल्या नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. ७ फेब्रुवारी 2020 रोजी पासून अमरण उपोषण करणार आहे आणि सदर काळात मला काही झाल्यास त्यास आपण जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी असे घरकुल लाभार्थी असलेले विजय बनसोडे यांचा मुलगा आदी बनसोडे यांनी केले आहे…