Home यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची अधोगतीकडे वाटचाल…!

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची अधोगतीकडे वाटचाल…!

111

सभासद कर्ज वाटप बंद ! दोन कोटी राखीव निधी बँकेत भरलाच नाही !

यवतमाळ –

एकेकाळी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या व सद्या ३१ कोटीच्या कागदोपत्री ठेवीच्या हेराफेरीमुळे वादग्रस्त ठरलेल्या यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची अधोगतीकडे वाटचाल सुरू असुन गेली अनेक वर्ष स्वबळावर असणाऱ्या या पतसंस्थेने ईतर वित्तीय संस्थेकडून १५ कोटीचे कर्ज घेतले आहे. सहकारी कायद्यानुसार नफ्यामधून २ कोटी राखीव निधी मध्यवर्ती बँकेत भरणे अनिवार्य असतांनाही आर्थिक अडचणीमुळे हा निधी बँकेत भरण्यात आलेला नाही.

जुन २०२२ मध्ये सेवानिवृत्त अध्यक्ष नको हा मुद्दा करून तब्बल २२ वर्षानंतर या पतसंस्थेत सत्ता परिवर्तन झाले. परंतु विद्यमान संचालक मंडळाने व सेवानिवृत्त अध्यक्षाने अनेक वादग्रस्त निर्णय घेवून सभासदांना वेठीस धरले आहे. मागील २१ वर्ष स्वबळावर उभी असलेल्या या पतसंस्थेच्या ठेवी मागील १७ महीन्यात ४० कोटीने कमी झाल्या आहेत. परिणामी ज्या दीवशी अर्ज त्या दिवशी कर्ज ही जुण्या संचालक मंडळाची योजना सेवानिवृत्त अध्यक्षाने गुंडाळुन ठेवली असुन सभासदांचे कर्ज वाटप बंद केले आहे. या ऊलट आपल्या मर्जीतील अनेक थकीत व सवानिवृत्तीस अत्यल्प अवधी असणाऱ्या सभासदांना मागच्या दाराने कर्ज वाटप सुरू आहे. थकीत सभासदांना कर्ज वाटप केल्यामुळे एन.पी.ए. चे प्रमाणे प्रचंड वाढले असुन या प्रकारामुळे संस्था अधोगतीकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वचननाम्यामध्ये अनेक फसवी आश्वासने देवून सत्ता प्राप्त केलेल्या या संचालक मंडळाने एकही वचन पुर्ण कले नाही. या उलट सभासदांच्या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारून सभासदांचे शोषन करण्याचा प्रकार या संस्थेत घडला आहे. संस्थेमध्ये विद्यमान सेवानिवृत्त अध्यक्षाच्या नेतृत्वात अनेक गैरप्रकार घडल्याची सभासदांमध्ये चर्चा असुन अनागोंदी कारभाराविरूध्द एक महीन्याआधी शेकडो सभासदांनी प्रचंड आंदोलन केले होते. संस्था सद्या आर्थिक अडचणीत असल्याने अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत काढण्याचा सपाटा लावला आहे. नुकत्याच एक पतसंस्थेने आपल्या चार कोटी रूपयाच्या ठेवी परत मागीतल्या आहे. जि.प. पतसंस्थेकडे पैसे नसल्याने या संस्थेला टप्प्याटप्प्याने ठेवी परत करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहीती आहे.

सभासदांमध्ये प्रचंड असंतोष

सभासदांना वेळेवर कर्ज न मिळणे, चक्रवाढ व्याज आकारणे, मासिक ठेवीवर व्याज कमी देणे, सेवानिवृत्त अध्यक्षाने राजीनामा न देणे, संस्थेत प्रचंड नियमबाहय कामे करणे, चुकीच्या ठीकाणी नियमबाहय गुंतवणुक करणे आदी प्रकारामुळे जिल्हातील सभासदांमध्ये प्रचंड असंतोष असुन या संचालक मंडळाला सत्ता देवून आमची प्रचंड चुक झाल्याची भवना अनेक सभासद व्यक्त करत आहे. नावारूपास आलेल्या या संस्थेचे अशा प्रकारे लचके तोडण्यात येत असेल तर आगामी काळामध्ये या सेवानिवृत्त अध्यक्षाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाविरूध्द प्रचंड मोठे आंदोलन होण्याची शक्यता आहे. एकंदरीत राजुदास जाधव यांच्या २२ वर्षाच्या कार्यकाळात विकासाच्या यशोशिखरावर गेलेल्या या पतसंस्थेला घरघर लागल्यामुळे अनेक सभासद दुःख व्यक्त करीत आहे.