Home यवतमाळ घाटंजी तहसील कार्यालयातील ” त्या ” हप्तेखोर कंत्राटी कर्मच्याऱ्यावर वरदहस्त कोणाचा …..?

घाटंजी तहसील कार्यालयातील ” त्या ” हप्तेखोर कंत्राटी कर्मच्याऱ्यावर वरदहस्त कोणाचा …..?

129
घाटंजी -रेती तस्करांचं माहेरघर असणाऱ्या घाटंजी तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अवैध वाळू वाहतुकीचा धुमाकूळ गाजला असतानाच आणखीन एक नवीन गौप्यस्पोट झाला आहे, त्यात एका मोठ्या पक्षाच्या माजी मंत्र्यांचा सासेमीरा करून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दर दिवशी बुडवून स्वतः दर दिवशी लाखो रुपये कमविणाऱ्या तसेच घाटंजी तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हप्ते वसुली करणाऱ्या कंत्राटी कामगारावर तात्काळ चौकशी करावी असे परिसरातून चर्चेचे सूर निघत आहेत.
या कंत्राटी कामगारावर का आळा घातल्या जात नाहीत ? यावर नेमका वरदहस्त कोणाचा ? अशा अनेक गंभीर व निरुत्तरित प्रश्नांची उकल लवकरच होणार आहे.
सविस्तर वृत्त असे की गेल्या काही महिन्यांपासून अवैध रेतींचा काळा बाजार करणाऱ्या विरोधात अनेक तक्रारी तसेच वृत्तपत्रांमध्ये बातम्या झळकत असताना त्याकडे हेतूपूर्वक वरिष्ठांकडून दुर्लक्ष केल्या जात आहेत याचे परिणाम रत्नापूर येथे विशाल शेडमाके याचा मृत्यू झाला .
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नापूर हे क्षेत्र श्रीशैलवटकर यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे या प्रकरणाच्या खोलवर जाण्याकरिता व वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याकरिता अमोल कोमावार यांनी पत्राद्वारे वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशीसाठी मागणी केलेली आहे अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा .असे स्पष्ट नमूद केलेले आहे.
घाटंजी तहसील कार्यालयात वादग्रस्त नायब तहसीलदार दिलीप राठोड यांच्या अनेक अनियमितता त्याचप्रकारे अनेक प्रकरणे प्रत्यक्ष साक्षी पुराव्यासह दोषी असल्याबाबत निश्चित होऊन सुद्धा मोठ मोठ्या मंत्र्यांचे वशिले लावून व वरिष्ठांना “पॉकेट प्रसाद “देऊन दडपल्या जात आहेत.
लोकशाही न्यायव्यवस्थेचा सुद्धा सर्रास फज्या उडवल्या जात आहे या राजरोसपणे संगन मताने मिळून मिसळून उघड उघड भ्रष्टाचार रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून चौकशी समिती बसवून तात्काळ कारवाईसाठी अतिशय वेगाने हालचाली चालू असल्याचे सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळत आहे.