Home यवतमाळ लॉगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची झानभूमीला भेट

लॉगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची झानभूमीला भेट

121
प्रतिनिधी
लॉंगमार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी अचानकपणे झानभूमी या ऐतिहासिक वास्तू शिल्पाला भेट दिली. डॉ. अशोक बोधी यांनी दोनशे कोटी रुपये खर्च करून यवतमाळ जवळ असणाऱ्या यवतमाळ नागपूर रोड वरील चापर्डा या ठिकाणी झानभूमीची निर्मिती केली आहे.
या निर्मिती मागचा उद्देश भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार करणे हा असून ठिकाणी विविध प्रकारची प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. जगातील सर्व धर्मग्रंथांवरती चर्चा व्हावी याकरिता सर्वधर्मग्रंथासहित झानभूमीला जागतिक ग्रंथालय उभे करण्यात आलेले आहे. सोबतच डायनामिक मेडिटेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली असून या सेंटरच्या माध्यमातून भारतामध्ये विविध प्रकारे असणाऱ्या ध्यान साधनांचा अभ्यास केला जाणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या जाणभूमीला दोन लाख लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. या भेटीदरम्यान भारतातील व जगातील विविध प्रकारच्या विद्वान मंडळींनी आपले अभिप्राय नोंदविले असून त्या प्रसिद्ध असणाऱ्या या मॉनेस्ट्रीला जागतिक पारितोषिक सुद्धा प्राप्त झाले आहे.
भीमराव आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे पासून तर भारताच्या तसेच राज्यांच्या विविध मंत्रिमंडळांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सुद्धा भेट दिली आहे. या ठिकाणी असणारे शिल्प तसेच विविध प्रकारच्या असणाऱ्या बौद्ध वास्तू प्रत्यक्षात पाहायला मिळतात. जगातील झानभूमीतील शिल्प एकमेव शिल्प असून या परिसराला अनेक मान्यवर अफलातून मॉनेस्ट्री म्हणून अभिप्राय देतात. डॉ. अशोक बोधी आणि त्यांचे बंधू प्रकाश कांबळे या दोघानी ही मेहनत घेतली आहे.