प्रतिनिधि : मजहर शेख,नांदेड
दि.२६ – किनवट तालुक्यातील सारखणी येथील आदिवासी समाजातील सरपंच सूर्यभान जंगा सिडाम यांना मारहाण व जातीवादी शिवीगाळ व मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांना दोन लोकांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रातून मिळालीआहे,
याबाबत अधिक माहिती अशी की मौजे सारखणी तालुका किनवट येथील सरपंच सूर्यभान जंगा सिडाम दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी ग्रामपंचायत समोर घडल्याचे बोलल्या जाते येथील दोन लोकांवर गजानन रामराव पवार आणि शेख दस्तगीर शेख अजीज राहणार सारखणी यांच्यावर ग्रामपंचायतचे दोन लाईट चोरीने नेल्याच्या कारणावरून चांगलीच झमकली वरील दोन लोकांनी सरपंच सूर्यभान सीडाम यांना बेदम मारहाण करून जातीवादी शिवीगाळ करून लोखंडी राडणे मारून करून पाय फ्रॅक्चर केला यासंबंधीची फिर्याद सरपंच सूर्यभान सीडाम यांनी सिंदखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे आणि सपोनी सुशांत किनगे यांनी अनुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील दोन आरोपी फरार झाल्याचे सांगण्यात आले अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे करीत आहे