जालना /लक्ष्मण बिलोरे
– ‘येत्या २४ डिसेंबर पर्यंत मराठा ओबिसी मधून आरक्षण दिले नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १७ डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा समाज बांधवांची बैठक घेण्यात येणार आहे.मराठा समाजाच्यावतीने राज्यसरकारला विनंती आहे की, आरक्षणाच्या बाबतीत भुजबळांचे ऐकून दगाफटका केला तर गाठ मराठ्यांशी आहे,मराठे काय करतील हे सांगता येत नाही.’
असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.’ येत्या २४ डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर शांततेत परंतु सरकारला न झेपणारी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. नोंदी सापडल्यामुळे मराठा ओबिसी मध्ये आहे,हे सिद्ध झालं आहे.आंदोलकांवरील राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्या,कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीतील शासकिय कार्यालयातील कक्ष बंद झाले असून ते पुन्हा सुरू करा.अंतरवाली सराटी आंदोलनातील आंदोलकाला अटक का केली ? अगोदर एनसीआर घेवून पुन्हा पिसिआर का घेतला ? जिल्हा पोलिस प्रशासनाने निरपराध,शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर अंतरवाली सराटी येथे केलेला प्राणघातक हल्ला आम्ही विसरलेलो नाही.सरकारच्या वतीने आलेल्या मंत्र्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.येत्या दोन दिवसांत अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या .महिनाभरात राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. भलथापा देवून आमच्याशी दगाबाजी करू नका.मराठ्यांचा रोष पत्करू नका.’ मंत्री छगन भुजबळ यांना जरांगे पाटील यांनी लक्ष्य केले.’आम्ही आमचे हक्काचे आरक्षण मागत आहोत.आम्ही ओबिसीतून आरक्षण घेणारच असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.सभेच्या प्रारंभी जालना शहरातून मोटारसायकल रैली काढण्यात आली. संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.जरांगे पाटील यांच्यावर जिसिबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.