Home यवतमाळ जांब ग्राम पंचायतीवर माजी आमदार राजू तोडसाम गटाचे वर्चस्व

जांब ग्राम पंचायतीवर माजी आमदार राजू तोडसाम गटाचे वर्चस्व

87

सरपंच पदी रमेश सिडाम तर उपसरपंच पदी त्र्यंबक आत्राम

घाटंजी – तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाचे समजल्या जाणाऱ्या जांब ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यात थेट जनतेतून रमेश सिडाम हे निवडून आले तर दिनांक ५ डिसेंबर मंगळवारला उपसरपंचाची निवड पार पडली यात त्र्यंबक आत्राम बिनविरोध निवडून आले असून सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद यांच्या नेतृत्वात माजी आमदार प्रा.राजू तोडसाम गटाचा झेंडा फडकला आहे.
निवडणूक काळात अत्यंत चुरशीचे वातावरण निर्माण झालेल्या जांब ग्राम पंचायतीकडे तालुक्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले होते.पारवा जिल्हा परिषद मधील सर्वच निवणुकांचे गणित जांब गावावरूनच जुळवल्या जात असल्याचे ऐकण्यात आहे त्यामुळे सर्वच राजकीय मंडळी येथिल निवडणुकीकडे लक्ष देत असल्याचे समजते.याठिकाणी माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांचे निकवर्तीय मानले जाणारे सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली.प्रतिस्पर्धी गटाने अतोनात प्रयत्न केले मात्र सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद यांच्या पुढे त्यांची जादू कुचकामी ठरत अल्प सदस्यांवर समाधान मानावे लागले. यात सय्यद जावेद यांच्या गटातील सरपंच रमेश सिडाम थेट जनतेतून बहुमताने निवडून आले.त्याच सोबत काशिराम कुळसंगे,त्र्यंबक आत्राम, मनोहर गेडाम, संगीता चौधरी,मोहिनी मडावी, सुमित्राबाई मडावी हे सदस्य बहुमताने निवडून आलेत.सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद यांचे नेतृत्वाने याही निवडणुकीत किमया दाखविल्याने यानंतर निवडणूक लढवायची की नाही अशी स्थिती विरोधकांची झालेली दिसून आली.या निवडणुकीत ओंकार कुलसंगे, राजेन्द्र मडावी, मुखत्यार शेख,रमेश आत्राम, गजानन आत्राम,पंकज आत्राम,रामदास वाढईकर,राजू घाटोड, दिगंबर सुर्तिकर, रामकृष्ण वाढई, सुनिल बा.आत्राम यांनी अथक परिश्रम करून मोलाचे सहकार्य केले.