पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड यांची आज रोजी पत्रकार परीषेदेत माहीती…!
यवतमाळ : जिल्हातील गांजा तस्करी व विक्रीचा समुळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी विशेष मोहीम हाती घेतली असुन जिल्ह्यात पहील्यांदाच मोठ्या प्रमाणात एन.डी.पी.एस अतर्गंत कारवाह्या करण्यात आल्या त्यापैकी काल पुन्हा दोन ठिकाणावरून 28 किलो गांजा जप्त केल्याची माहीती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.पवन बनसोड यांनी माहिती दिली. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अतर्गंत येत असलेल्या ग्राम पारध येथे पोलीसांना माहीती मिळाली कि ग्राम पारध येथे आरोपी रमेश शिवराम जाधव व त्याचा पुतण्या इंदल हिरालाल जाधव याचे राहते घरी एकुन 13 किलो गांजा हिरवा किंमत 2 लाख 72,440 रूपयाचा गांजा जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसरी कारवाई एका कारमधुन गांजा सह आरोपीला अटक करण्यात आली यामध्ये आरोपी सलमान शेख शकील शेख रा.अंबीका नगर हा त्याचे राखाडी रंगाचे इंडीका कार क्रमांक एम.एच.34 एन.ए.1157 या वाहनातुन गांजा नावाचा अंमली पदार्थ घेवुन देवगाव वरून यवतमाळ कडे येत आहे.अशी खात्रीलायक माहीती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन आरोपी सलमान शेख शकील शेख (28) रा.अंबीका नगर व वाहन चालक आरोपी सलमान शेख इक्बाल शेख (26) रा.सुराणा लेआऊट यवतमाळ यास ताब्यात घेवुन त्याचे वाहनाची तपासणी केली असता एका पोत्यात 15 किलो गांजा किंमत 3 लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा गांजा ओडीसा वरून यवतमाळ येथे आणण्यात येत होता अशा आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखा यांनी आरोपींना अटक करण्यात आली.