गावकऱ्यांची गट विकास अधिकाऱ्याकडे मागणी.
—————————————-
घाटंजी – तालुक्यातील पंगडी येथिल ग्रामसेविका कोलते यांची कार्यप्रणाली अतिशय चांगली असून यापूर्वी पेक्षा सध्यास्थितीत ग्राम पंचायतिचे कारोबार सुरळीत चालू असताना गावातील दोन इसम ग्राम पंचायतीच्या कोणत्याही पदावर नसतांना राजकिय वरदहस्त वापरून विनाकारण त्रास देण्याचा बहाण्याने गट विकास अधिकारी यांचे कडे ग्राम सेवकांच्या बदलीची मागणी करीत आहे.मात्र या ग्रामसेविका यांची बदली न करता पंगडी येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी उपसरपंच, सदस्य व गावकऱ्यांनी लेखी निवेदन गट विकास अधिकारी यांचे कडे देवून मागणी केली आहे.
पंगडी येथिल सरपंच यांची अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे प्रकरण चालू असल्याने प्रथमच गावाचा विकास थांबला आहे.त्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्राम सेविका यांची बदली करावी यासाठी ग्राम पंचायतीच्या कोणत्याही पदावर नसलेले गजानन चिंचोलकर व मदन मुनेश्वर हे राजकिय वरदहस्त वापरून गट विकास अधिकारी यांचे कडे वारंवार तक्रारी करीत आहे. त्यामुळे गावाचा विकास खोळंबू शकतो. विरोधात तक्रार देणाऱ्यांचे गावाचा विकास थांबविण्याचा मानस असून ग्राम पंचायती मध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत असल्याने ही बदली होवू नये यासाठी उपसरपंच प्रमोद कदम यांचे सह सदस्य संकेत धांदे,भीमराव घोडाम, छाया राजू चिंचोलकर,विद्या राजू चौधरी सोबतच विजय भोयर,नागोराव मूनेश्वर,रंजन धांदे,रामकृष्ण कनाके,रवी मुनेश्र्वर,रवी भोयर,विजय चौधरी, मुकिंदा जगताप या गावकऱ्यांनी गट विकास अधिकारी यांचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कडे निवेदन देवून बदली करण्यात येवू नये अशी मागणी केली आहे.मात्र बदली केल्यास रीतसर लोकशाही मार्गाने आम्हाला उपोषण करावे लागेल असेही निवेदनात नमूद केले आहे.असे उपसरपंच प्रमोद कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.