Home वाशिम रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्याचे जिल्हा पोलीस...

रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आदेश ,

99

 

फुलचंद भगत
वाशिम:-रस्तेवर उभे असलेले वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहनामुळे अपघात घडु त्याअनुषंगाने अनुज तारे ( भा.पो.से) पोलीस अधीक्षक वाशिम यांनी सर्व ठाणेदार वाशिम जिल्हा, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतुक शाखा व सपोनि शहर वाहतुक शाखा वाशिम यांना दिनांक
08.12.23 ते दिनांक 15.12.23 पर्यत विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशीत केले आहे.सदर विशेष मोहिम अंतर्गत रस्तेवर उभे असलेले वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे एकुण 459 वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करुन 2,59,500 रु दंड आकारण्यात
आला तसेच 64 कसुरदार वाहन चालकांवर कलम 283 भादवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत.रस्तेवर उभे असलेले वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहनांवर यापुढे सुध्दा सदर मोहिम
सुरु राहिल असे अनुज तारे (भा.पो.से) पोलीस अधीक्षक वाशिम यांनी सुचित केले आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206