शरीफ शेख
रावेर , दि. ०५ :- रावेर शहर व परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की, शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा,राजे शिवाजी महाराज चौक,रावेरतर्फे आयोजित प्रखर शिववक्ते प्रा. श्री नितिन बानुगडे पाटील (रहिमतपूर , सातारा ) यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. हे व्याख्यान ८ फेब्रुवारी रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजता नियोजित जागेवरच म्हणजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेजवळील प्रांगणात होईल. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा रावेर यांच्या मार्फत केली आहे.