Home बुलडाणा संपादक कैलास राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ जाहीर.

संपादक कैलास राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ जाहीर.

75

मेहकर प्रतिनिधी –

देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संपादक कैलास हरिभाऊ राऊत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे.
मातोश्री वत्सलाबाई बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था साखरखेर्डा दै. महाराष्ट्र सारथी व चौफेर दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मानाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 देण्यात येणार आहे. कैलास राऊत यांनी मागील पंधरा वर्षापासून आजपर्यंत केलेल्या विविध सामाजिक कार्याबद्दल व पञकारितेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल, आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून साखरखेर्डा येथे येत्या 30 डिसेंबर रोजी सदर पुरस्काराने संपादक कैलास राऊत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कैलास राऊत यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये निर्भीड पत्रकारिता करून समाजातील अनेक गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे . रोखठोक व निर्भीड लिखाणामुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात जिल्हाभर नावलौकिक मिळवलेला आहे त्याचबरोबर तरुणाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमातून गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन अनेकांना मदतीचा हात दिला आहे. ते विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असून त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सर्व सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील 90 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित केलेले आहे . पुढील काळातही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरिबांची जनसेवा करण्याचे सतत प्रयत्न त्यांचे असणार आहे.30 डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.