Home विदर्भ गर्भपिशवी शिवाय पुत्रप्राप्तीचा ‘तो’ दावा खोटा

गर्भपिशवी शिवाय पुत्रप्राप्तीचा ‘तो’ दावा खोटा

116

पं.मिश्रा यांनी वाचली खोटी माहिती…! 

मनिष गुडधे अमरावती :

अमरावती विभागातिल अकोला जिल्ह्यात येणाऱ्या तेल्हारा निवासी अर्चना अशोक श्रीवास हिच्या भक्तीच्या शक्तीपुढे विज्ञानही फिके पडले. तिला चक्क गर्भपिशवीशिवाय पुत्रप्राप्ती झाली. हा दावा शिवपुराण कथावाचक पं.प्रदीप मिश्रा यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र तसे झालेच नसल्याचे गुलदस्त्यातील सत्य बाहेर आले आहे. पं.मिश्रा यांनी ज्या महिलेच्या पत्राचे जाहीर वाचन या कथेला हजर ८ लाख लोकांसमोर केले. आता त्याच महिलेने पुढे येत तो वादग्रस्त दावा खोडून काढला आहे.

शिवपुराण कथावाचक पं.प्रदीप मिश्रा हे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात लाखों भाविकांसमोर शिवभक्तांना आलेल्या अनुभूतीचे पत्रांचे वाचन करत भक्तीच्या शक्तीपुढे विज्ञानही कसे फिके पडते याचे दाखले देतात. त्यांच्या त्या दाखल्यांची चांगली-वाईट चर्चा तर खूप होते, परंतु त्यांची पडताळणी करण्यास मात्र कुणीच धजावत नाही. असाच अविश्वनीय दावा त्यांनी अमरावतीतही केला. येथे त्यांनी देवाधिदेव महादेवांवरिल पक्का विश्वास आणि शिवभक्तीच्या जोरावर अर्चना श्रीवास या महिलेस गर्भपिशवीशिवाय पुत्रप्राप्ती झाली असे सांगत त्या महिलेला लाखों भाविकांनी भरगच्च भरलेल्या कथामंडपात व्यासपीठावर उभे केले होते. या दाव्याची सर्वदूर चर्चा सुरु आहे. देवाच्या कृपेने काहीही होऊ शकते असे मानणारे व विज्ञानाला कुणीच चॅलेंज करू शकत नाही यावर ठाम असणाऱ्यांत वैचारिक युद्धाच्या फैरी झडत आहेत. तोच, मी जे पत्र लिहून दिले त्या पत्रातील मजकूर खरा नव्हता. घाई-घाईत पत्र लिहतांना गर्भपिशवी काढली असे माझ्याकडून चुकीने लिहल्या गेले होते. प्रत्यक्षात केवळ गर्भाशयातील गाठच काढण्यात आली होती,असी जाहीर कबुली अर्चना श्रीवास हिने दिली. त्यामुळे सर्वदूर प्रसिद्ध व ज्यांच्या कथेला लाखों भक्तांची गर्दी उसळते ते पं.मिश्रा हे त्यांना येणाऱ्या पत्रांची कुढलीच शहानिशा न करताच विविध अविश्वनीय दावे कसे करतात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पं. मिश्रा यांच्या अमरावतीत आयोजीत ५ दिवशीय शिवपुराण कथेचे बुधवारी (ता. २०) समापन झाले. केवळ ‘एक लोटा जल’ हाच साऱ्या दुःखांवरील साधक-सार्थक उपाय असल्याचे ते सगळ्यांना सांगून गेले. या ५ दिवसादरम्यान त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट येथील सुषमा खंडेलवाल यांच्या मुलाचा चर्मरोग, वडगावच्या पलक जोशी यांना झालेली पुत्रप्राप्ती, चांदुर बाजारच्या युवकाचा दूर झालेल्या सोरायसीस. अगदी मृत्युशय्येवरून उठून उभा झालेला व्यक्ती असे शेकडो भक्त शिवभक्तीच्या शक्तीचे साक्षात प्रमाण स्वरूप समाजात असल्याचे त्यांनी त्या-त्या भक्तांच्या अनुभूती पत्रांचे जाहीर वाचन करीत सांगितले. जो व्यक्ती मृत्युशय्येवरून उठून उभा झाला आहे त्याच्याही घरी शिवभक्तीच्या शक्तीचे प्रमाण घ्यायला नक्की जा असा सल्लाही त्यांनी शिव पिंडीवर जल व बेलपत्र अर्पित केल्याने काय होते असा सवाल करणार्यांना दिला होता. परंतु केवळ भक्तांच्या पत्रांच्या आधारे, त्या पत्रांची कुठलीच शहानिशा न करताच हे अविश्वनीय दावे सुरु असल्याचे ( तशी जाहीर कबुल केलेल्या अर्चना श्रीवास हिच्या कबुलीने ) उघड झाले आहे.