घाटंजी – यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव पोलीस स्टेशन मध्ये हेड मोहरर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील बाभूळगाव पोलीस स्टेशन मध्ये स्वच्छता मोहीम अग्रस्थानी ठेवून पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाग निर्माण करून त्या बागेची मनोभावे देखभाल करून विशेष निघा ठेवल्या जाते.त्यामुळे ही बाग येणार जाणाऱ्यांचे मन ओढवून घेते.याच सोबत सर्वांना एक समाधानी वातावरण प्रदान करते.याशिवाय या पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या प्रत्येक फिर्यादीला येथिल अधिकारी व अमलदार सन्मानजनक वागणूक देत त्यांच्या समस्या प्रामाणिक ऐकून घेत त्यांच्या तक्रारीवरून योग्य ती कारवाई करून फिर्यादीचे पूर्णतः समाधान करून गुन्हेगारांवर आळा घातल्या जातात.येथिल ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनतेचे समाधान केल्या जात आहे. या बाबीचा सारासार विचार करून वरिष्ठ स्तरावरून दखल घेत या पोलीस स्टेशनने महाराष्ट्रात उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून दुसरा क्रमांक पटकाविला आहे हे विशेष त्याबाबीची विशेष दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी ठाणेदार यांचेसह हेड मोहरर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने नुकतेच शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.या सन्मानाने तालुक्यासह वाहवा मिळविली असून सर्वत्र स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.