जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार :-जव्हार तालुक्यातील शेवटचे टोक असणारे भुरिटेक ग्रामपंचायत हद्दीत भुरिटेक ते आडोसी देवबांध नदीवर भूरी टेक जव्हार ते आडोशी मोखाडा तालुक्यात असून येथे वर्षानुवर्ष पुलाचे आश्वासन देऊन सुद्धा पुढील विषय मार्गी लागत नव्हता लोकसभा विधानसभा इलेक्शन आले की आमदार खासदार किला उभे राहिलेले उमेदवार नारळ फोडून जायचे, मतदान करा लगेच पूल बांधतो असे खोटे आश्वासन देऊन मते मिळवत असतात. नारळ फोडतो की पुढे जसा
तसे खूप प्रयत्न करून हाती निराशा पदरात पडत होती.कोणते इलेक्शन असो लोकांनी मागणी फक्त एकच पूल इतका पाहिजे बस अशी दोन्ही ग्रामपंचायत मधील नागरिकाकडून वारंवार नागरिकाकडून पुलासाठी होत होती.
पुढे या पुलाचे शेजारी भुरिटेक ते आडोशी आश्रम शाळा आहे इयत्ता बारावीपर्यंत आहे. दररोज शाळेमध्ये 30 ते 40 शाळकरी मुले शाळेत पायी ये जा करत असतात. भुरिटेक ते आडोशी दोन किलोमीटर अंतर आहे. पावसाळ्यात पूल नसल्यामुळे खूप मोठी अडचण निर्माण होते. तेथील मुलांना पूल नसल्यामुळे शाळेत फेऱ्याने सात किलोमीटर अंतरावर चालत जावे लागते. सरपंचाच्या प्रयत्नाने उद्घाटन पुलाचे उद्घाटन करण्यात आले व काम चालू झाले सर्व दोन्हीही ग्रामपंचायत मध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. सरपंच आत्माराम दत्तू लामते तसेच सर्व भुरिटेक ग्रामपंचायत सदस्य यांचे कौतुक होत आहे. सोबत पुलाला मदत म्हणून ठेकेदार विठ्ठल चोथे यांचे खूप मोठे योगदान आहे. . त्याने पुलासाठी पाठपुरावा करून अखेर गावाच्या फुलांना सुरुवात झाली आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित सरपंच आत्माराम लामठे, आडोसी सरपंच काळू घाटाळ, ठेकेदार संतोष चोथे, राजू लामठे, चंदर शेवाळे, अमोल आमटे, उपसरपंच सचिन धोंगडे, आडोशी उपसरपंच संतोष घाटाळ इत्यादी उपस्थित होते.