पंढरपूर (प्रतिनिधी) ः पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे (पंढरपुर लाईव्ह न्युज) यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक श्रीकांत कसबे (जोशाबा टाईम्स), गौतम जाधव (सा.विठ्ठल टाईम्स्) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संघटनेच्या पंढरपूर येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
शहराध्यपदी यशवंत कुंभार (दै.प्रीतीसंगम), शहर कार्याध्यक्षपदी कबीर देवकुळे (वादळ न्युज), शहर उपाध्यक्षपदी सचिन दळवी (दै.जनपथ), शहर सचिवपदी मिलींद गायकवाड (सा.पंढरपुरी तालीम), तालुकाध्यपदी संजय हेगडे (दै.सकाळ), तालुका कार्याध्यक्षपदी लक्ष्मणराव जाधव (दै.दिव्य मराठी), तालुका उपाध्यक्षपदी जैनुद्दीन मुलाणी (सा.युवा राष्ट्रचेतना), तालुका सचिवपदी प्रकाश सरताळे (दैनिक एकमत), तालुका खजिनदारपदी सुधाकर खरात (सा.ज्ञानप्रवाह), शहर व तालुका प्रसिध्दीप्रमुखपदी नागेश काळे (महाराष्ट्र नाऊ 24) आदी नुतन पदाधिकार्यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अशोक गोडगे (शोध न्युज), नंदकुमार देशपांडे उमेश टोमके, डॉ. राजेश फडे (ज्ञानप्रवाह), सदस्य शंकर पवार (दै.पुण्यनगरी), कल्याण कुलकर्णी (दै.सुराज्य), सलीम मणेरी (दै.बाळकडु), अमोल कुलकर्णी (दै.राष्ट्रसंचार), अनिल सोनवणे (दै.जागर), अमोल गुरव (दै.कटुसत्य), शरद कारटकर, सचिन माने (दै.नवमित्र), शंकर कदम (सा.धन्यवाद) विकी साठे (मराठी बातमी 24 तास) आदी उपस्थित होते.
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण समिती ही संघटना संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असुन संघटनेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच पत्रकारांच्या सर्वांगिन विकासासाठी कार्य केले जाते. सर्वसामान्य पत्रकारांना (जो विविध माध्यमाद्वारे बातम्या प्रसिध्द करतो, समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवतो) अशा पत्रकारांना शासकीय मान्यता व शासनाच्या सोईसुविधा मिळण्यासाठी ही संघटना सध्या प्रयत्न करत आहे. आपण सर्वजण आपल्यातील एकी कायम ठेवुन आपल्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न करु. असे मनोगत यावेळी बोलताना संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी व्यक्त केले.