Home बुलडाणा चोरट्यांनी चक्क ‘एटीएम’च नेले उचलून जालन्यातून दोन आरोपीसह एटीएम मशीन जप्त ,

चोरट्यांनी चक्क ‘एटीएम’च नेले उचलून जालन्यातून दोन आरोपीसह एटीएम मशीन जप्त ,

127

 

अमीन शाह

बुलडाणा ,

संग्रामपुर येथील स्टेट बॅकेचे समोर असलेले एटीएम चोरट्यांच्या टोळीने चक्क लाखोंच्या रक्कमेसह एटीएम उचलून नेल्याची खळबळजनक घटना संग्रामपूर येथे ६ जानेवारी रोजी रात्री तीन वाजता दरम्यान घडली. स्टेट बॅके समोर एटीएम चोरट्यांनी विना नंबर असलेली पांढरी पिक अप सदर वाहनाला बांधुन ओढले व एटीएम त्याच वाहनात टाकुन वरवट बकाल रसत्याने भरदाव वेगाने सुसाट वाऱ्या सारखी वाहन घेऊन निघुन गेले मात्र तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी तपासाची चक्रे फिरवित दोघा आरोपींना जालना येथून स्टेट बॅकेचे एटीएम सह ताब्यात घेतले. मशिन मधील रक्कम सुरक्षित असल्याने तामगाव पोलिस सह स्टेट बॅकेचे अधिकारी कर्मचारीनी सुटकेचा श्वास सोडला. सदर घटनेची माहिती स्टेट बॅकेचे मॅनेजर शेखर चौरे तामगाव पोलीसांना रवीवारी पहाटे साडेतीन वाजता ही बाब लक्षात येताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. स्टेट बँकेच्या संग्रामपूर शाखेचे व्यवस्थापक शेखर चौरे यांना एटीएम व्यवस्थापक सचिन सुरडकर यांनी ‘अलर्ट’ आल्याचे सांगितले. त्यावर चौरे यांनी संग्रामपूर मधील एटीएम स्थळी भेट दिली असता, दाराची काच फोडलेली दिसली. तसेच रक्कम असणारा भाग लंपास झाल्याचे दिसून आले. एटीएम मध्ये १७ लाख ७८ हजार रुपये असल्याचे त्यांनी तामगाव ठाणेदार प्रमोद उलेमाले याना सांगितले. एटीएम व्यवस्थापक सचिन सुरडकर यांच्या फिर्यार्दी वरुन तामगाव पोलिसांनी तपास चक्रे फिरविली आरोपीविरुद्ध तामगाव पोलीसात भादवीच्या कलम ३८०, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दोन आरोपी ‘एटीएम’सह पकडले ,

काही तासांतच दोन आरोपींना एटीएम व त्या वाहनासह पकडण्यात जालना पोलिसांना यश आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी तामगाव पोलीस ठाण्याचे विशेष पथक जालना कडे रवाना झाले आहे.
तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी विदर्भ दस्तकशी बोलताना माहिती दिली. जालना पोलिसांनी दोघा आरोपींना एटीएम व मालवाहू वाहन पकडले. पोलिसांनी जालना येथे पाठविण्यात आलेल्या पथकात पोलीसासह स्टेट बँकेच्या संग्रामपूर शाखा व्यवस्थापक, एटीएम तंत्रज्ञ यांचा समावेश होता. घटनेतील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या दोघा साथीदारकडून त्यांची माहिती घेऊन त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहितीही ठाणेदार उलेमाले यांनी दिली.ठाणेदार यांनी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली.तसेच जालना, अकोला, जळगाव आदी सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे सदर घटनेतील आरोपी लवकर पकडण्यात यश आले

ही घटना तपासाच्या दृष्टीने तामगाव पोलीसांना आव्हानात्मक होती. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव आज संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे संकल्प यात्रेवर होते. त्यामुळे पोलीस दुहेरी दडपणात होते. मात्र दोन आरोपी, एटीएम व वाहन सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे एवढे मात्र खरे ,

 

दरोडेखोरांची जप्त करण्यात आलेली गाडी ,