Home यवतमाळ घाटंजी नगर परिषदेत पत्रकारांचा सन्मान

घाटंजी नगर परिषदेत पत्रकारांचा सन्मान

74

घाटंजी(तालुका प्रतिनिधी)मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून घाटंजी नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर यांनी सर्वत्र पत्रकार बांधवांना निमंत्रित करून नगर परिषद कार्यालयात शाल व पेन डायरी देवून सत्कार करून सन्मान केला.
सतत उपेक्षितांना आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान झाला पाहिजे असे मनात बाळगून घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर हे रुजू झाल्यापासून एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रकारांचा सन्मान करतात.त्याच प्रमाणे याही वर्षी दिनांक ६ जानेवारी रोज शनिवारला सर्वत्र पत्रकाराचा सत्कार करून सन्मान केला. या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल माळकर हे होते.यावेळी सर्व प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा प्रदान करून कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,लोकशाहीत पत्रकारांचे स्थान चौथ्या स्थंभावर आहे. पहिलीची पत्रकारिता व आजची पत्रकारिता यावर माहिती विषद करीत ब्रिटिश काळात दर्पण हे वृत्तपत्र अन्यायाला वाचा फोडणारे ठरले.आजही वृत्तपत्र समाज हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामगिरी करीत असून माझ्या विद्यार्थी दशेपासून मला आजही वृत्तपत्र वाचण्याची गोडी कायम आहे.यामध्ये पत्रकार बांधवांनी पत्रकारिता करीत असताना निर्भिड व निःपक्ष आणि समाजहितासाठी केली पाहिजे.असे नमूद केले. या सन्मानाने पत्रकार बांधव भारावून गेले होते.याच सोबत पत्रकार संतोष पोटपिल्लेवार यांच्या घरकुलाचे उर्वरित हप्ता पत्रकार दिनी देण्यात आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.हे विशेष यावेळी घाटंजी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेन्द्र देवतळे, उपाध्यक्ष दिनेश गाऊत्रे, सचिव राजू चव्हाण यांचे सह जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे चंद्रकांत ढवळे,पांडुरंग निवल, सागर संमनवार,संतोष पोटपिल्लेवार,अरुण कांबळे, प्रेमदास चव्हाण,योगेश ढवळे, ओम ढवळे, मुकेश चिव्हाने,कुणाल तांगडे,रमेश मादस्तवार आदी पत्रकार उपस्थित होते.या कार्यक्रमाला लेखापाल प्रविण हातमोडे, कार्यालय अधीक्षक प्रकाश घोती,पाणी पुरवठा अभियंता निकिता देशमुख,अभियंता नितीन बोपटे,बंटी गवई,दत्ता उरकुडे,दत्ता पेटेवार, आशिष गिरी,गोडे यांचे सह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून पत्रकारांचा सन्मान केला.