Home बुलडाणा मधुकरराव जी खंडारे…._बहुजन भूमिहीनांचा आक्रोश थंडावला_

मधुकरराव जी खंडारे…._बहुजन भूमिहीनांचा आक्रोश थंडावला_

72

*मधुकरराव खंडारे….*
_बहुजन भूमिहीनांचा आक्रोश थंडावला_.
🌿🌿🌿🌿🌿🌿
*जो जमीन सरकारी है ओ हमारी है*असा नारा घराघरात गुंजविणारा, पोटच्या गोळ्या प्रमाणे इवल्याशा रोपट्यांना उराशी बाळगून त्याचे संगोपन करून वृक्षसंवर्धणाचा संदेश देणारा वृक्षप्रेमी आज मधुकरराव खंडारे यांच्या रूपाने काळाने हिरावला आहे.
आदिवासी, मागासवर्गीय, बहुजन भूमिहीन अतिक्रमित जमीनधारकावर होणारे अत्याचार थांबविण्यात यावे यासाठी , १९९१ पासून ते २0१५ पर्यंत बहुजन भूमिहीनांच्या ताब्यातील जमिनीचे पट्टे देण्यासाठी नवीन जी आर काढला जावा म्हणून खंडारे शासकीय दरबारी झगडले.
उपोषणे, मोर्चे अशी किती तरी आंदोलने त्यांनी छेडली आहेत.
वनेत्तर जमिनीवर वृक्ष संवर्धनास अधिक व्यापक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराच्या रकमेत प्रशासनाने भरीव वाढ केली आहे. पुरस्काराच्या रकमेत वाढ केल्याने वृक्षरोपण व संवर्धन करणा-या व्यक्ती पात्र ठरल्या मात्र मधुकरराव यांनी कधी तो पुरस्काराचा अट्टाहास केला नाही. त्यांचा विचार देखील व्यवस्थेला शिवला नाही हे विशेष.
सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून खंडारे यांनी अख्खा परिसरात इवलेसे रोपटे लावले ते सावलीदार झाडे डांगोडांगी विस्तारले. त्याच्या फांद्या सर्व दूर पसरल्या. हे खंडारे यांच्या अविश्रांत परिश्रमाची फलश्रुती आहे. पंधरा वर्षांपूर्वीच्या त्यांच्या आंदोलनाचे वृत्तांकन करताना मला आलेले अनुभव शब्दबद्ध करता येत नाही. पण हल्लीच्या पुढाऱ्यांना त्यांची प्रकाशित बातमी कोणत्या पानावर आहे, हे सांगून ती सोशल मीडियावर टाकून देखील सांगायचे लागते खंडारे यांच्या जमान्यात सोशल मीडियाचा जन्म नव्हता तेव्हा उद्याच्या अंकाचे ते डायरीत खोसलेले घामाचे पैसे देऊन ठेऊन वृत्तपत्र जपून ठेवण्यात सांगायचे. त्या काळी इन मिन दहा जनवाद यायचे त्यातील पाच अंकाचे दहा रूपये मधुकरराव देऊन जायचे. त्यामुळे त्यांच्या बातम्या छापण्याचा आनंद मिळायचा..
उंद्रीच्या प्रदीप आंभोरे यांच्या भूमि मुक्ती मोर्चाची ताकद मधुकरराव मुळे लोकांना कळली. हे तितकेच खरे!.
नंतरच्या बदलत्या काळात भाडेपट्टय़ाचा मुद्दा लयाला गेला अन झाडे जगवा चा बुरखा टराटर फाटला वृक्ष लागवडीचे मधुकररावांचे ध्येय दुसरीकडे जाचक अटी वाढलेला गैरव्यवहार त्यांना अजिबात पटला नाही. ऐवढेच काय त्याच्या श्रमाची पाच. पावती वनश्री च्या रूपाने मरताना देखील त्यांना मिळाली नाही याची खंत बोचते.
अचानक हा हिरवागार वृक्षराजीने बहरलेला महामेरू काळाने अचानक हिरावला..
◽भावपूर्ण पुष्पांजली◽
🌿🌿🌿🪴🪴🌾🌾🥀🥀
♦️संतोष गाडेकर