Home यवतमाळ जिल्हास्तरीय महसूल ,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या नावावर रेती तस्करांकडून लाखो रुपयाची वसुली.

जिल्हास्तरीय महसूल ,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या नावावर रेती तस्करांकडून लाखो रुपयाची वसुली.

97

घाटंजी ( प्रतिनिधी )

जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023 – 24 चे आयोजन उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यावतीने फुलसिंग नाईक महाविद्यालय येथे दिनांक 5/1/24 ते 7/1/24 पर्यंत आयोजित केलेले होते. आणि ह्या कार्यक्रमाचा खर्च घाटंजी तहसीलदार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात नायब तहसीलदार श्री होटे व वादग्रस्त नायब तहसीलदार श्री. दिलीप राठोड यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नावावर लाखो रुपयांची वसुली रेती तस्करांकडून केली असल्याची तक्रार अमोल कोमावार यांनी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना दिली.
सविस्तर वृत्त असे की,जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023 – 24 चे आयोजन उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यावतीने फुलसिंग नाईक महाविद्यालय येथे दिनांक 5/1/24 ते 7/1/24 पर्यंत आयोजित केलेले होते त्या सांस्कृतिक स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च हा नियमानुसार वर्गणी करून करायचा असतो परंतु या स्पर्धेच्या नावाखाली घाटंजी तहसीलचे तहसीलदार विजय साळवे हे सुट्टीवर असताना त्यांच्या मार्गदर्शनात प्रभारी तहसीलदार श्री होते व अनेक गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचार प्रकरणाने वादग्रस्त असलेले नायब तहसीलदार श्री दिलीप राठोड यांनी सर्रास रेती तस्करांकडून लाखो रुपयांची माया जमवून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर यांच्या स्वाधीन केली. आणि या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच संबंधित वरिष्ठांकडे चौकशी व कारवाईसाठी तक्रार केली असून घडलेल्या प्रकरणाबाबत त्यावेळेसचे सी .सी. टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यासाठी सुद्धा विनंती केलेली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. दिलीप राठोड नायब तहसीलदार यांच्या विरोधातील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या 155 अंतर्गत केलेल्या आदेशाच्या तक्रारीवर सुनावणी दरम्यान साक्षी पुराव्यासह दाखल केलेल्या प्रकरणात संबंधित दिलीप राठोड या अधिकाऱ्यावर कारवाई केलेले गेलेली नाही. आणि मौजे भिलायता येथे जप्ती व पंचनामा केलेली रेती चोरी गेलेली दाखवून प्रकरण बंद केल्या गेले. त्या प्रकरणाबाबत पुन्हा चौकशीचे आदेश देण्याकरिता अमोल कोमावार यांनी केलेल्या तक्रारीवर साक्षी पुरावे मागितले. त्यामुळे या दुटप्पी कारभारामुळे अनेक प्रकरणात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहाय्यक जिल्हाधिकारी हे स्वतः जाणीवपूर्वक दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे त्यामुळे त्यांना लोकसेवक असल्याचा विसर पडलेला असून कर्तव्याशी प्रामाणिक नाही हे स्पष्ट होतांना दिसत आहे.
विजय साळवे हे तहसीलदार घाटंजी या पदावर रुजू झाल्यानंतर घाटंजी तहसील कार्यालयाचा कारभार मनमानी पद्धतीने तसेच संविधानिक , कोणतेही नियम न पाळता, ” स्वयंघोषित कायदे व नियम ” अशा पद्धतीने चालत आहे या संदर्भात माननीय आयुक्त, अमरावती. जिल्हाधिकारी ,यवतमाळ. यांच्याकडे अनेक तक्रारी प्रलंबित असून यावर हेतू पुरस्कार कारवाई केल्या जात नाही त्यामुळे भविष्यात निवडणुकीच्या तोंडावर “संविधान बचाओ “आंदोलन करण्याचा इशारा एका पत्रकाद्वारे वरिष्ठांना दिलेला आहे.