रस्ता लुटीचा बनाव करणाऱ्या तक्रादारावरच पोलिसांनी केला गुन्हा दाखल ,
फुलचंद भगत ,
मालेगांव वाशीम
पोलिसांना खोटी माहिती देऊन
दिशाभूल करणे पडले महागात दि.12 जानेवारी रोजी तक्रारदार प्रकाश पुंडलिक पळसकर वय 65 वर्षे रा. डोनगाव जि. बुलडाणा हे पोलीस स्टेशन मालेगाव येथे तक्रार देण्याकरिता आले की ते व त्यांचे साथीदार डोणगाव येथून मेडशी येथे जात असताना मालेगाव बायपास येथे दोन इसम पल्सर गाडीवर आले व तक्रारदार यांचे गाडीवर ठेवलेली 5,00,000/ रूपायांची बॅग घेऊन अकोला च्या दिशेने पळून गेले आहे.
अशा माहितीवरून पोलीस स्टेशनचे कर्मचार्यांनी घटनास्थळावर तात्काळ भेट देऊन संशयित आरोपीची शोधाशोध केली असता आरोपी मिळून आले नाही त्या मुळे पोलिसांना संशय आला तक्रारदार व त्यांचे साथीदार यांची कसून चौकशी केली असता त्या दोघांनी पैसे लुटून नेल्याचा बनाव केला असल्याचे आढळून आले
असे निष्पन्न झाले यावरून पोलीस निरीक्षक चौधरी यांनी तक्रारदारावर पोलिसांची दिशाभूल करणे व पोलिसांना खोटी तक्रार देणे या संबंधाने कलम 182 ipc प्रमाणे कारवाई करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशन मालेगाव येथील तपास पथक PI संजय चौधरी. यांच्या नेत्तृत्वात Api योगेश धोत्रे, Asi सैबेवार, कैलाश कोकाटे सुनिल पवार शिवाजी काळे , जितु पाटील, अमोल पवार यांणी काम बघीतले. यातील तक्रारदार यांनी पैसे लुटीचा बनाव का केला या बाबत माहिती मिळू शकली नाही ,