Home जालना मैत्रेय प्रकरणी कोर्टातून केवळ ‘तारिख पे तारिख’ मिळत असल्याने गुंतवणूकदार हैराण

मैत्रेय प्रकरणी कोर्टातून केवळ ‘तारिख पे तारिख’ मिळत असल्याने गुंतवणूकदार हैराण

77

जालना /लक्ष्मण बिलोरे

– राज्यभरातील लाखों गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘मैत्रेय’ उद्योग समुहाच्या विरूध्द मुंबई शेशन कोर्टात गुंतवणूकदार संघटनेच्या वतीने प्रकरण दाखल करण्यात आलेले.राज्यसरकारने घोटाळेबाज मैत्रेय ग्रुप ऑफ् कंपनीची मालमत्ता जप्त करून संचालक मंडळावर गुन्हे दाखल केलेले आहे.’मैत्रेय’ प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.मैत्रेयच्या जप्त मालमत्ता विक्रीची ऑर्डर कोर्टामार्फत मिळाल्यास शासन मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना परतावे देवू शकते.परंतु मागील वर्षभरापासून गुंतवणूकदारांची महिला संघटना मुंबई कोर्टात येरझरा मारत आहेत.आज २३ जानेवारी रोजी मैत्रेय प्रकरणी तारिख होती.संघटनेच्या महिला हजर होत्या.गुंतवणूकदार संघटनेला कोर्टाकडून एकमेव अपेक्षा आहे की,कोर्टाने मैत्रेयच्या जप्त मालमत्ता विक्रीची ऑर्डर काढावी परंतु दरवेळी कोर्टाकडून मैत्रेय प्रकरण निकाली काढण्यासंदर्भात काहिनाकाही अडथळे येत आहेत.आजच्या तारखेला कोर्ट रजेवर असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे मैत्रेय मालमत्ता विक्रीची ऑर्डर दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे.गोरगरिब गुंतवणूकदार ज्यांनी पोटाला चिमटा देवून,धुनीभांडी घासून,मोलमजुरी करून ‘मैत्रेय’ मध्ये पैपै पैसा जमा केला.गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून मैत्रेय संचालकांनी,मैत्रेय सिनियर लोकांनी स्वतः ची घरं भरली.न्यायालयाला मैत्रेय गुंतवणूकदार लोकांच्या हाल अपेष्टांबाबत पाझर का फुटत नाही ?
आणखी कितीदिवस न्यायाची प्रतिक्षा करावी लागणार आहे ? असा हृदय हेलकावणारा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.