Home विदर्भ सालोड (हि.) येथील प्रा. वर्षा विश्वनाथ साटोणे – लाडेकर यांना आचार्य पदवी...

सालोड (हि.) येथील प्रा. वर्षा विश्वनाथ साटोणे – लाडेकर यांना आचार्य पदवी प्रदान.

93

देवळी … तालुका प्रतिनिधी…

सेंट जॉन कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव (मेघे) येथे कार्यरत असलेल्या प्रा. वर्षा विश्वनाथ साटोणे – लाडेकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातर्फे *इतिहास* या विषयात आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्या सालोड (हिरापूर) येथील रहिवासी मोहन तुकारामजी लाडेकर यांच्या पत्नी आहेत. त्या सालोड (हि.) गावातील आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या प्रथम महिला आहेत. विविध भूमिका जसे आदर्श मुलगी, पत्नी, सून, शिक्षिका पार पाडून तसेच अडी-अडचणींवर मात करुन त्यांनी हे यशाचे शिखर गाठलेले आहे. त्यांनी यशवंत महाविद्यालय वर्धा येथील प्राध्यापक डॉ. विरेंद्रसिंह बैस सर यांच्या मार्गदर्शनाखाली “संत संताजी जगनाडे महाराज व संत तुकाराम महाराज यांचा तुलनात्मक अभ्यास” या विषयात आपला शोधप्रबंध सादर केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. विरेंद्रसिह बैस सर, सौ. बैस मॅडम, त्यांचे पति मोहन लाडेकर, वडील विश्वनाथजी साटोणे, भाचा प्रशांत मुडे, धनश्री मुड़े (झाडे), शिवम् तडस (चंद्रपूर), समाजसेवक प्रमोदराव वांदिले, माजी सभापती शरयुताई वांदिले, सुनील बाभळे, त्याची मुलगी कु वेदांती लाडेकर, मानसपुत्र, कृष्णा जोशी, कुणाल-सावरकर, कुणाल चौधरी, अंकुश वर्भे, सासू व सासरे यांना दिलेले आहे. त्यांचे परिसरात सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.