एमआयएमने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले पत्र ,
अमीन शाह
बुलढाणा
मुफ्ती सलमान अझहरी साहेब यांना गुजरात एटीएस पोलिसांनी कथित खोट्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ सुटका करन्यात यावी या मागणीसाठी आज मंगळवार दि.6 फेब्रुवारी रोजी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोबीन खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मुफ्ती सलमान अझहरी साहेब यांना नुकतेच एका निराधार आणि कथित खोट्या प्रकरणात गुजरात एटीएसने मुंबईतून ताब्यात घेतले आहे. मुफ्ती साहेबांची देशात आणि जगात वेगळी ओळख आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेक तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर झाले आहेत. वाईट मार्गाने जाणारे सरळ मार्गाने जात आहे देशभरातील बड्या मुस्लिम धर्मगुरूंच्या यादीत मुफ्ती सलमान अझहरी साहेब आघाडीवर आहेत. अशा स्थितीत त्याना एटीएसने ताब्यात घेतल्याने मुस्लिम समाज आणि मुस्लिम जगतात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुफ्ती साहेबांच्या तात्काळ सुटकेसाठी देशभरात अर्ज, निदर्शने, आंदोलने आदींच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ , मोबिन खान , मीर वसीम रजा, सलमान रजा, अमिरुद्दीन रजा, शेख सोहेल, अक्रम शेख, मोहसीन भाई, मो. अबुजर, अरबाज शेख, नावेद पठाण, बबलू काजी, शेख साबीर शेख रहीम, इम्रान शेख, मो. आकिब, सय्यद अनैद, इरफान, मो. खान, सय्यद तस्लीम, शेख रफिक, कैफ खालिक, माझ कुरेशी, शेख रशीद, राहिल शेख, जुनेद बेग, जुबेर पठाण, मो. शाहबाज, शाहरुख खान आदी उपस्थित होते.