Home मुंबई राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्यत्व मिळवतांना दाखवलेली संघटना व त्यावरील न्यास नोंदणी क्रमांक...

राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्यत्व मिळवतांना दाखवलेली संघटना व त्यावरील न्यास नोंदणी क्रमांक बनावट

195

अभ्सासू जेष्ठ पत्रकारांनी केली माहिती महासंचालनालयाची फसवणूक

“अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ” लवकरच उच्च न्यायालयात तक्रार दाखल होणार ?

मुंबई – राज्य अधिस्विकृती समितीच्या नियमावलीत समावेश असलेल्या एका संघटनेच्या अध्यक्षाला अनेक वर्षांपासून सदस्यत्व देण्यात आले व त्यापोटी मिटींग भत्ताही देण्यात आला. परंतु सदरील संघटना ही न्यास नोंदणीकृत नसून त्यावरील टाकलेला न्यास नोंदणी क्रमांक हा पुण्याच्या महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुणे-३० या संघटनेचा असल्याची माहिती माहितीचा अधिकारी अधिनियम २००५ अन्वये जन माहिती अधिकारी तथा अधिक्षक अभिलेखा, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पुणे-३० यांनी तक्रार धारकाला लेखी दिली.

अधिक माहिती अशी की, राज्य अधिस्विकृती समितीच्या नियमावलीत गेल्या अनेक वर्षांपासून समावेश असलेली संघटना ही न्यास नोंदणीकृत नसून सदरील संघटनेच्या अध्यक्षांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई यांना दिलेल्या पत्रावर टाकलेला न्यास नोंदणी क्रमांक हा एमएएच/२३/पुणे/१९७८ हा पुण्याच्या महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुणे ३० या संघटनेचा असून या संघटनेचे अध्यक्ष हे वसंत सदाशिव काणे या नावाने नोंद सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पुणे येथे असल्याचे लेखी पत्र दिल्यावरून अर्जदाराने सदर ही बाब मा. महासंचालक साहेब, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय मुंबई यांच्या निर्दशनास आणून देऊन शासनाच्या झालेल्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. सदरील तक्रारीची दखल न घेतल्यामुळे तक्रार धारकाने बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस महासंचालनयाला दिली होती.

सदरील बाबीची गंभीरता घेत मा. संचालक ( माहिती, वृत्त व जनसंपर्क यांनी ) संबधीतास लेखी पत्र देऊन दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथील होणारे बेमुदत आमरण उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केल्यावरून संबंधीताने त्यांच्या पत्राचा आदर करीत हे उपोषण तुर्त स्थगित करीत असून त्वरीत कार्यवाही न झाल्यास आपण परत उपोषणाचा मार्ग स्विकारणार व उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्या पत्रात त्यांनी कळविले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या अभ्यासू जेष्ठ पत्रकाराने राज्य अधिस्विकृती समितीच्या सदस्यत्वासाठी बोगस संघटना व दुसऱ्या न्यास नोंदणीकृत संघटनेचा न्यास नोंदणी क्रमांक आपल्या पत्रा- वर लावून माहिती महासंचालनालयाची गेल्या अनेक वर्षांपासून फसवणूक केली असून त्या सोबतच मिटींग भत्ता उचलून आर्थिक फसवणुक करणारा व पवित्र पत्रिकारितेला काळिमा फासणारा हा जेष्ठ पत्रकार कोण ? या अभ्यासू जेष्ठ पत्रकारांचे एकेक कारनामे आता बाहेर येत आहे. महाराष्ट्रातून पत्रकारात व संघटनेत एक चर्चे चा विषय झाला आहे.