Home बुलडाणा राजुरी स्टील कंपनीच्या मॅनेजर ची गाडी अडवून 27 लाखाची लूट ,

राजुरी स्टील कंपनीच्या मॅनेजर ची गाडी अडवून 27 लाखाची लूट ,

74

गुन्हा दाखल दरोडेखोर फरार ,

 

घटनास्थळी डॉग स्कॉड पथकाची पाहणी ,

 

हानिफ शेख

अंढेरा(प्रतिनिधी):चिखली जालना रोडवर-अंढेरा फाट्याजवळ गाडी अडवून स्टील कंपनीचा मॅनेजर व चालकाला ५ते ६अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून २७लाख रुपय लंपास केल्याची घटना १४ फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान घडली असून चालकाच्या फिर्यादीवरून आज्ञात दरोडेखोर यांच्या विरोधात अंढेरा पोलीस स्टेशनला १५फेब्रुवारीच्या सकाळीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती,१४फेब्रुवारी च्या रात्री साडे आठ च्या दरम्यान जालण्याकडेकडे परत जाणाऱ्या जालना येथील राजुरी स्टील कंपनीच्या मालकाचे दुकानदाराकडून वसुली करून चिखली कडून जालना परत असताना वसूल करून आणलेली रक्कम २७ लाख रुपये रक्कम जालना येथे परत घेऊन जाणाऱ्या मुनीमजी व चालक हे बोलेरो वाहन क्रमांक एम एच२१,बी व्ही ७१६७ या वाहनाने जात असताना अंढेरा घाटात सदर वाहनाला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर व स्कॉर्पिओ या गाड्यातील अज्ञान ५ते६दरोडेखोरांनी गाडी थांबवून चालकास खाली उतरून त्त्यांच्या कंपनीच्या गाडीत बसून चालवत नेऊन सदर वाहनात ड्रायवर सह तिन जणांनी बसून सदर गाडी धोत्रा फाटया जवळ नेऊन चाकूचा धाक दाखवून मुनीमजी व चालकाचे हात पाठीमागे करून दोरीने ने बांधून वसूल करून आणलेली रक्कम २७लाख रुपये घेऊन पळुन गेले या घटनेची फिर्याद चालक रामेश्वर शिवप्रसाद श्रीमाली यांनी दिल्या नंतर रात्रीच १५फेब्रुवारीच्या सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या घटनास्थळी डी वाय एस पी मनीषा कदम. अंढेरा पोलीस स्टेशन चे ठणेदार विकास पाटील,श्वान पथक ,तर अंढेरा पोलीस स्टेशनचे पी एस आय हरिहर गोरे,कैलास उगले,गोरख राठोड,, सिद्धार्थ सोनकांबळे, भरत पोफळे श्रीकांत पोहरे,,रामेश्वर आंधळे, राजकुमार पवार आदी उपस्थित होते.