Home बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस वीज पडून युवकाचा मुत्यु ,

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस वीज पडून युवकाचा मुत्यु ,

92

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस वीज पडून युवकाचा मुत्यु ,

अमीन शाह

बुलढाणा : आज दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या
सुमरास जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
विज, वादळी हवा आणि पाणी यामुळे शेतकरी पुन्हा
संकटात सापळला आहे. शेगाव तालुक्यातील टाकळी
(विरो) या गावातील रहिवासी इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर
घरून कामावर जाण्यासाठी निघाला असता जयपूर लांडे
फाट्या जवळ त्या युवकाच्या अंगावर विज पडली व तो
जागेवरच मृत्यू पावला. सुरज सुभाष निंबाळकर वय (२२)
अशे या युवकाचे नाव आहे. तसेच घरची परिस्थिती
गरिबीची असल्यामुळे तो पेट्रोल पंपावर काम करून
आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. मृत्यू झालेला
सुभाष हा लहान भाऊ होता. मोठा भाऊ हा एका
कंपनीमध्ये काम करत असून वडील शेत मजुरी करतात.
परंतु विज पडल्याने त्या युवकाचा मृत्यू तर झालाच
कुटूंबावर सुद्धा डोंगर कोसळलेला आहे. संबंधीत
विभागाने पंचनामा करुन तत्काळ आर्थिक मदत दयावी
अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण

गावात हळहळ व्यक्त होत आहे.