Home बुलडाणा दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार,दोघे जख्मी ,

दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार,दोघे जख्मी ,

62

 

हानिफ शेख

अंढेरा/पाडळी शिंदे,दि१७(प्रतिनिधी):-
अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत दि.१७फेब्रुवारी २०२४ रोजी दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघातात एक ठार तर दोन किरकोळ जख्मी झाले.
याबाबत पोलिस सु‌ञांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेदरम्यान अंढेरा फाट्यावरुन अंढेरा गावाकडे भरधाव वेगाने येणारे मोटारसायकल स्वार आपली मोटारसायकल स्लिप झाल्याने पाठीमागे बसलेल्याला डोक्याला जबर मार लागल्याने तात्काळ पुढील उपचारासाठी देऊळगाव मही येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्याच्या पश्चात पत्नी,आई,वडील,बहीण,दीड वर्षाचा मुलगा असा परिवार त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ,मूळचे
बायगांव बु येथील रहिवासी असलेले एका खासगी कंपनीत संभाजीनगर येथे कामाला असणारे साले मेहुणे हे लग्न समारंभासाठी गावी आले होते.सायंकाळी पाच ते साडे पाच वाजेदरम्यान अंढेरा फाट्यावरुन बायगांव बु कडे जात असताना पारधीवस्ती जवळ भरधाव पल्सर मोटारसायकल एम.एच.२० सीक्यु ८३२४ स्लीप झाल्याने साले मेहुने हे गावी असतांना मोटारसायकल चालक मेहुणा राधेश्याम पवार (रांजणगाव)हे जख्मी झाले असुन पाठीमागे बसलेले साले प्रदिप विजय चव्हाण रा.बायगांव बु. याला डोक्याला जबर मार लागल्याने तात्काळ धोञा नंद‌ई येथील जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या अॕब्युलन्सने देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तर दुसऱ्या घटना आंचरवाडी फाट्याजवळ वंसतनगर फाट्याजवळ एका मोटारसायकल ला भरधाव आयशरनए धडक दिल्याने मोटारसायकल स्वारास डोक्याला मार लागल्याने त्याला चिखली येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. वृत्त लिहे पर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.