फातेहा पढून व फ्रुट वाटप करून निषेध नोंदविला..
रावेर (शरीफ शेख)
जळगाव , दि. ०६ :- मुस्लिम मंच तर्फे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा एन आर सी व एन पीआर याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा बुधवार ४० वा दिवस होता.
जळगाव मुस्लिम मंचच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः सक्रिय सहभाग नोंदवून हे निषेध नोंदविले.
*पहिला व ४० वा उपोषणाचा दिवस मुस्लिम मंच च्या नावे*
जळगाव शहरातील सर्व धार्मिक पंथीय, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय पक्षातील व्यक्तींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या मुस्लिम मंच च्या माध्यमाने हे उपोषण सुरू असले तरी २३ डिसेंबर उपोषणाचा पहिला दिवस व ५ फेब्रुवारी हा उपोषणाचा ४० वा दिवस मुस्लिम मंच या पदाधिकाऱ्यांनी स्वतः एकत्रित बसून हे निषेध नोंदविले.
*उपोषणार्थी नी केले मार्गदर्शन*
उपोषणाची सुरुवात फारुक शेख याच्या पवित्र कुराण पठाणाने झाली यावेळी अश्फाक पिंजारी, शरीफ शाह बापू ,करीम सालार, फिरोज मुलतानी, फारुक शेख,अयाज़ अली, हाफिस शाहिद, हमीद जनाब, वहाब शेख, अब्दुल रहिम यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
*४० व्या दिवशी फातेहा*
मुस्लीम धर्मात चाळीस दिवसाच्या वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्यात हजरत नूह अलै सलाम यांची माशीच्या पोटातून चाळीस दिवस प्रार्थना केल्यानंतर सुटका झाली होती त्याच धर्तीवर चाळीसाव्या दिवशी विशेष अशी फातेहा( प्राथना) करुन केळी चे वाटप करण्यातआले
फातेहा हाफिस रशीद यांनी पडली व त्यावर सर्वांनी आमीन असे उद्गार काढले
*सरकारचे हातचे ठेऊन अभिननदन*
निश्चितच सरकार एक पाऊल मागे पडली व एन आर सी लावणार नाही अशी घोषणा लोकसभेत केली त्याबद्दल मंचने सरकारच्या या घोषणेचे स्वागत केले व सरकारला विनंती केली की आपण सुधारित नागरिकत्व कायदा व एन पी आर सुद्धा मागे घेण्यात यावा आम्ही आमचे उपोषण मागे घेऊ अशी सर्वानुमते मागणी सुद्धा करण्यात आली.
*उपजिल्हाधिकारी श्रीमती दीपमाला चौरे यांना निवेदन*
मुस्लिम मंच चे समन्वयक फारुक शेख यांच्या नेतृत्वात अयाज अली, फिरोज मुलतानी, अश्फाक पिंजारी, रिजवान जागीरदार, रईस बागवान, गुलाब बागवान, हमीद जनाब, अन्वर सिकलिगर, फारूक अहिलेकार, शरीफ शाह, अल्ताफ शेख, मुख्तार शेख, फिरोज अब्बास, रशीद खान, रफिक करीम, शेख हसन, हमीद हवालदार, सय्यद नूर, शेख मोहसीन ,एडवोकेट अन्वर शेख, एडवोकेट अमीर शेख, गुलाम दस्तगीर, जमील शेख मन्यार, आदींनी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती दीपमाला चौरे यांना निवेदन दिले.