Home यवतमाळ आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन….

आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन….

63

यवतमाळ – कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था,व देवपुष्प वेलनेस’ सेंटर यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ मार्च ते ५ मार्च रोजी बालाजी हॉटेल,वाघापूर रोड,यवतमाळ या ठिकाणी सकाळी ठीक ९.०० वाजता “आहार-आरोग्यविषयक मार्गदर्शन” सत्राचे अगदी निशुल्क पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.या मार्गदर्शन सत्रात मुलींच्या आरोग्यावर चढउतार,अनावश्यक भिती,मासिक पाळी व यासंबंधी घ्यावयाची काळजी त्याबाबतचे उपचार,पौष्टिक आहार,जंक फूड खाण्याचे तोटे,वाढत वजन,विकनेस,त्वचा विकार,संतुलित आहार,ब्रेन हेल्थ,आहाराचे महत्व,आरोग्यविषयक महत्वाच्या समस्या,शारीरिक सुदृढता,वाढत कुपोषण,गरोदर महिलांची घायवयाची काळजी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.सदरील कार्यक्रमाकरीता प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहार तज्ञ,आरोग्यसल्लागार तथा वेलनेस कोच मा.पूजा डवले उपस्थित राहणार आहेत.सत्रात सहभागी होणाऱ्यांना सकाळचा ब्रेकफास्ट,पाणी बॉटल,नोटपॅड व पाणी बॉटल दिली जाणार आहे.आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी,युवा वर्ग,तसेच महिला भगिनींनी आवश्य लाभ घ्यावा असे आव्हान ‘कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे’ अध्यक्ष प्रा.पंढरी पाठे यांनी केले आहे.