Home यवतमाळ मराठा सेवा संघ जिल्हा कार्यकारिणीची सभा संपन्न….

मराठा सेवा संघ जिल्हा कार्यकारिणीची सभा संपन्न….

65

रविवार दिनांक ३ मार्च २०२४

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी…

रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी यवतमाळच्या सहकार भवन येथे मराठा सेवा संघाचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा संपन्न झाली.सभेची सुरूवात मा. जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या प्रतिमांना माल्यारर्पन करून जिजाऊ वंदननेने करण्यात आली.या प्रसंगी विचारमंचावर मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष डॉ.दिलीप महाले,माजी अध्यक्ष कुडूपले,जि.प.कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सोनेकर सर,मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पुंडलीक बुटले सर,जिल्हा सचिव शशिकांत खडसे सर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे,प्रा.सुनील कडू,मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष उल्हास रणनवरे,इत्यादी उपस्थित होते.


या प्रसंगी डॉ.दिलीप महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठा सेवा संघाची स्थापना ते आजपर्यंत केलेले कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षाची स्थापना करण्या मागचा उद्देश, मराठा सेवा संघ हा कुठल्याही एका जातीपुरता नसून त्याचे कार्य अखील माणवजातीला सर्व दास्यातून मुक्त करण्यासाठी असून मराठा सेवा ही केवळ एक संघटना नसून ते एका विचारांचे नांव असल्याचे प्रतिपादन केले.
या वेळी मराठा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी शिवश्री विनोद डाखोरे यांची तर विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोरेश्वर हेपट, इंजि. सुनील खडसे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. प्रशांत कडू, प्रशांत वानखडे,संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रा.पंढरी पाठे, अनिल वाघचोरे, किशोर चव्हाण, अजय गावंडे, अशोकराव महल्ले, किरण सावंत, दिपक भाऊ पिसाळकर, सुरज पाटील, अनिकेत मेश्राम, निशाताई बुटले, स्नेहल रेचे,उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष सी.ए.श्रीजित इंगोले, उपाध्यक्ष डॉ.गावंडे,सचिव सुनील देशमुख या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद डाखोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील कडू यांनी मानले.